'संगीतशास्त्र क्‍लिष्ट करू नका'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

पुणे - ""संगीतशास्त्र विनाकारण क्‍लिष्ट करू नका. अशाने संगीतात नवे गायक तयार होणार नाहीत आणि संगीताचा श्रोताही वाढणार नाही. शास्त्र सहज-सोपे हवे आणि त्यावर सर्वांचे एकमत हवे,'' असे मत ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी येथे व्यक्त केले. 

पुणे - ""संगीतशास्त्र विनाकारण क्‍लिष्ट करू नका. अशाने संगीतात नवे गायक तयार होणार नाहीत आणि संगीताचा श्रोताही वाढणार नाही. शास्त्र सहज-सोपे हवे आणि त्यावर सर्वांचे एकमत हवे,'' असे मत ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी येथे व्यक्त केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र आणि स्वरमयी गुरुकुल यांच्या वतीने "आलोक' या मालिकेअंतर्गत "संगीतशास्त्र आणि प्रस्तुती' या विषयावर सांगीतिक संवाद आयोजिण्यात आला आहे. या विषयावर सप्टेंबर ते जानेवारीदरम्यान पंधरा सत्र होणार असून, पहिल्या सत्रात डॉ. अत्रे यांनी संगीतातील वेगवेगळे बारकावे उलगडले. संगीताचे अभ्यासक प्रा. चैतन्य कुंटे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. 

डॉ. अत्रे म्हणाल्या, ""आपण संगीत ऐकतो; पण ते समजून घेऊन ऐकतो का? त्यासाठी साधनेची आवश्‍यकता आहे, असे वाटते का? विद्यार्थी-श्रोत्यांना असे वाटणे महत्त्वाचे आहे. कलाकार होण्यासाठी जीवनभर साधना गरजेची आहे. तशीच साधना श्रोत्यांनीही करायला हवी. तरच कलाकार आणि श्रोत्यांचा एका स्तरावर येऊन संवाद होऊ शकतो; पण हल्लीच्या विद्यार्थ्यांना प्रश्‍नच पडत नाहीत. जे शिकवले जात आहे, ते डोळे बंद करून शिकायला तयार होतात. श्रोत्यांनीसुद्धा जाणकार व्हायला पाहिजे. संगीत ही अमूर्त कला आहे. स्वर, लयाची भाषा समजून घेण्यासाठी अभ्यास करायलाच हवा.'' 

इतरांचे ऐकण्याची तयारी ठेवा 
""गायकाने प्रत्येकाचे गायन-वादन ऐकले पाहिजे. त्यात जे चांगले आहे ते आत्मसात करावे. याचा अर्थ कॉपी करा, असा अजिबात नाही. त्या गायकाची विचार करण्याची पद्धत, त्याचे विचार आत्मसात करा. त्यातून तुम्ही नवीन काय करू शकता, याचा सतत विचार करा. त्यासाठी आधी इतरांचे ऐकण्याची तयारी ठेवा,'' असा "धडा' डॉ. प्रभा अत्रे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

Web Title: pune news prabha atre