कलाकारांच्या विश्‍वासार्हतेमुळेच नाटक टिकेल - दामले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

पुणे - ""मनोरंजनाची साधनं आणि पर्याय कितीही वाढत गेले असले, तरीही रसिकांना आजही नाटक पाहायला आवडतं. नाट्यकला आणि त्यातील नवनवे प्रयोग हे रसिकांना अधिक जवळचे वाटतात आणि म्हणूनच ते नाटक पाहायला आजही गर्दी करतात. मात्र रसिकांनी नाटक पाहायला यावे, त्यांना ते पाहावेसे वाटत राहावे, याची जबाबदारी आम्हा कलाकारांची देखील आहे. कलाकारांच्या विश्वासार्हतेमुळेच नाटक माध्यम रसिकांच्या हृदयातील स्थान टिकवेल,'' अशा शब्दांत महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आणि नाट्यनिर्माते प्रशांत दामले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

"सकाळ नाट्यमहोत्सवा'च्या निमित्ताने आयोजित "कॉफी विथ कलाकार' या दिलखुलास गप्पांच्या कार्यक्रमात दामले बोलत होते. त्यांच्यासोबत पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळदेखील उपस्थित होते. 

गेल्या गुरुवारपासून "सकाळ नाट्यमहोत्सव' सुरू झाला आहे. पीएनजी ज्वेलर्स प्रस्तुत या महोत्सवाला एसटीए हॉलिडेजचे सहकार्य लाभत आहे. तर निरामय वेलनेस सेंटर आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी हे महोत्सवाचे सहप्रायोजक आहेत. 

दामले म्हणाले, ""चांगल्या कलाकृतीसाठी चांगले नियोजन आवश्‍यक असते. प्रयोगशील कला असल्यामुळे नाटकांत अनेकदा चुका होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मात्र त्या वेळीच दुरुस्त करण्यात या माध्यमाचे बलस्थान आहे. ललित कलांच्या क्षेत्रात होत चाललेल्या बदलांशीदेखील येत्या काळात अनुकूलन साधणे आवश्‍यक ठरेल. या अनुकूलनाच्या बळावरच मराठी नाटक देशाच्याही सीमा ओलांडून परदेशी जाऊन पोचत आहे.'' 

निवृत्तीआधी पुन्हा एकदा... ! 
प्रशांत दामले म्हणाले, ""मी ज्या वेळी निवृत्तीचा विचार करेन, त्या वेळी निवृत्ती आधी माझी सुरवातीपासूनची सर्व नाटकं पुन्हा एकदा करण्याचा माझा मानस आहे. त्यांतील अनेक आता बंद झाली आहेत. पण त्यांना एकेकदा तरी निवृत्तीच्या निमित्ताने नव्या तरुण रसिकांपुढे आणावीत, असा विचार आहे. त्याचा एक कायमस्वरूपी दस्तावेज त्यातून निर्माण होऊ शकेल.'' 

मराठमोळ्या रसिकांपर्यंत उत्तमोत्तम नाटके नेण्याचा "सकाळ'चा प्रयत्न स्तुत्य आणि अनुकरणीय असाच आहे. मराठी नाटकांत घडत असणारे नवे आणि चांगले बदल त्यातून रसिकांपुढे यायला मदतच होणार आहे. या नाट्यमहोत्सवाचा भाग आम्हाला होता आला, यासाठी आम्ही "सकाळ'चे आभारी आहोत. पीएनजी ज्वेलर्सतर्फे श्रावणात मंगळसूत्र महोत्सव भरविण्यात येणार आहे. पुणेकरांनी त्याचाही आस्वाद घ्यावा, असे आवाहन मी करतो. 
- सौरभ गाडगीळ (व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स) 

Web Title: pune news prashant damle entertainment