शहर, जिल्ह्यातील 22 जणांना राष्ट्रपती पोलिस पदक प्रदान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

पुणे - राज्य पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक, पोलिस शौर्य पदक, राष्ट्रपती पोलिस पदक आणि पोलिस पदक प्रदान करून गौरविण्यात आले.

पुणे - राज्य पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक, पोलिस शौर्य पदक, राष्ट्रपती पोलिस पदक आणि पोलिस पदक प्रदान करून गौरविण्यात आले.

राज्यपाल विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत मुंबई येथे नुकताच हा सोहळा पार पडला. गृह राज्यमंत्री रणजित पाटील, दीपक केसरकर, पोलिस महासंचालक सतीश माथूर यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मोहम्मद सुवेझ हक यांना पोलिस शौर्य पदकाने गौरविण्यात आले. तसेच, पुणे शहर आणि जिल्ह्यातील 22 पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पोलिस पदक देऊन गौरविण्यात आले.

पदक प्राप्त पोलिस अधिकारी- कर्मचारी -
डॉ. सुरेश मेकला (विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल), डॉ. जय जाधव (पोलिस उपमहानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण), चंद्रकांत गुंडगे (पोलिस निरीक्षक, प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड), संपत जाधव (सहायक पोलिस उपनिरीक्षक, वाहतूक शाखा, पुणे शहर), हणमंत आवळे (सहायक उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), राजेंद्र जगताप (पोलिस हवालदार, मुंढवा), अशोक झोळ (पोलिस हवालदार, पुणे शहर), मधुकर रणपिसे (सहायक उपनिरीक्षक, सीआयडी), बाळासाहेब टोके (सहायक उपनिरीक्षक, पुणे शहर), रामचंद्र तापकीर (पोलिस हवालदार, पुणे शहर), सुरेश इंगवले (पोलिस उपनिरीक्षक, पुणे शहर), शिवाजी धुरी (पोलिस उपनिरीक्षक, एसआरपीएफ गट- 1), तुकाराम पाटील (पोलिस उपनिरीक्षक, एसआरपीएफ गट- 1), वसंत गवळी (पोलिस उपनिरीक्षक, राज्य गुप्तवार्ता विभाग), पोपट कड (सहायक उपनिरीक्षक, एसआरपीएफ गट- 2), जीवनकुमार कापुरे (सहायक उपनिरीक्षक, एसआरपीएफ गट- 2), उल्हास गावकर (सहायक उपनिरीक्षक, एसआरपीएफ गट- 1), केशव हजारे (सहायक उपनिरीक्षक, एसआरपीएफ गट- 5), त्रिंबक घरत (पोलिस हवालदार, एसआरपीएफ गट- 2), पिराजी मोहिते (पोलिस हवालदार, एसआरपीएफ गट- 2), कमलाकर जाधव (पोलिस हवालदार, बिनतारी संदेश).

पोलिस पदकाचे श्रेय "सकाळ'ला
वाघोली येथील एका अपघातात वाकडेवाडी येथील सहाजण गंभीर जखमी झाले होते. त्यांना रिक्षाचालकाच्या मदतीने तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे पाचजणांचे प्राण वाचले. त्याचे विस्तृत वृत्त "सकाळ'ने प्रकाशित केले होते. त्याआधारेच मला राष्ट्रपती पोलिस पदक मिळाले. त्यामुळे सर्व श्रेय "सकाळ'ला जाते, अशी प्रतिक्रिया वाहतूक शाखेतील सहायक उपनिरीक्षक संपत जाधव यांनी व्यक्‍त केली.

Web Title: pune news president police award declare