मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

पुणे - मानसिक आजाराबाबतचे गैरसमज दूर करून त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आयोजित ‘बाइक रॅली’मध्ये तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. जागतिक मानसिक आरोग्य दिन येत्या मंगळवारी (ता. १०) साजरा होत आहे. त्या निमित्ताने समाजातील गैरसमज दूर करून त्यांच्यापर्यंत शास्त्रीय माहिती पोचविण्यासाठी ‘चैतन्य इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ’ आणि पुण्यातील ‘चैतन्यज्‌ आर्यार्जून फाउंडेशन’ यांनी पुढाकार घेतला आहे. ‘मेंटल हेल्थ कार्निव्हल’ उपक्रमांतर्गत पुढील तीन दिवस वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्याची सुरवात आज ‘बाइक रॅली’ने करण्यात आली.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयापासून सुरू झालेल्या या बाइक रॅलीत तरुणांचा सहभाग मोठा होता. या रॅलीचा समारोप डेक्कन येथे झाला.

‘चैतन्य इन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल्थ’चे संचालक रॉनी जॉर्ज म्हणाले, ‘‘मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘मेंटल हेल्थ कार्निव्हल’चे आयोजन केले आहे. मानसिक आरोग्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे हा याचा मुख्य उद्देश आहे. याची सुरवात बाइक रॅलीने करण्यात आली. समाजात मानसिक आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबाबत गैरसमज आहेत. मानसिक रुग्णाकडे कलंक म्हणून पाहिले जाते.’’ 

Web Title: pune news Public awareness about mental health