पुणे विभाग हागणदारीमुक्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

पाच जिल्ह्यांमध्ये ७ लाख ७४ हजार ८९८ स्वच्छतागृहे
पुणे - स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यातील सर्व जिल्हे हागणदारीमुक्त करण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सहा महसुली विभागांत पुणे विभाग शंभर टक्के हागणदारीमुक्त झाला आहे. पाच जिल्ह्यांमधील ५७ तालुक्‍यांत ५ हजार ६४५ गावांमध्ये ७ लाख ७४ हजार ८९८ स्वच्छतागृहे (शौचालये) बांधण्यात आली आहेत.

विभागीय आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये मिळून ५७ तालुक्‍यांमध्ये वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्याचे काम २०१४-१५पासून सुरू होते; परंतु यामध्ये सोलापूर वगळता चार जिल्ह्यांमध्ये वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यात येत होते. ३१ डिसेंबरअखेर पाचही जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के स्वच्छतागृह बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. राज्यात शंभर टक्के स्वच्छतागृह बांधणारा विभाग म्हणून पुणे विभाग ओळखला जात आहे.

Web Title: pune news pune area toilet free