ऑनलाइन परवान्यासाठी रोज 16 वाहनांचा कोटा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

पुणे - विविध प्रकारच्या सेवा देण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) ऑनलाइन सुविधा निर्माण केली खरी, परंतु त्यातील अडचणी मात्र अद्याप दूर झालेल्या नाहीत. चारचाकी मालवाहतूक आणि तीनचाकी प्रवासी वाहनांचा पक्का परवाना (लायसन्स) मिळण्यासाठी दिवसभराचा कोटा 16 इतकाच मर्यादित ठेवल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. हा कोटा वाढवावा आणि एक दिवसाऐवजी महिन्याभराचा कोटा खुला करावा, अशी मागणी शहरातील ड्रायव्हिंग स्कूलचालकांकडून होत आहे. 

विविध सेवा ऑनलाइन देण्याचा निर्णय आरटीओने घेतला आहे. त्यामध्ये शिकाऊ आणि पक्‍क्‍या परवान्यांचाही समावेश आहे. मात्र मालवाहतूक करणारी चारचाकी वाहने, तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांना पक्का परवाना मिळविण्यासाठी अपॉइंटमेन्टचा कोटा 16 इतका ठेवला आहे. तोसुद्धा रात्री दीड वाजण्याच्या सुमारास खुला केला जातो. शहरात शंभरहून अधिक ड्रायव्हिंग स्कूलचालक आहेत. कोटा अतिशय कमी असल्याने दहा ते पंधरा मिनिटांत संपतो. त्यात एका दिवसासाठीचा कोटा आरटीओकडून खुला केला जातो. परिणामी अनेकांना अपॉइंटमेन्ट मिळण्यास अडचण येते. 

शिकाऊ परवान्याची मुदत सहा महिने असते. त्या मुदतीत पक्‍क्‍या परवान्यासाठी अपॉइंटमेन्ट न मिळाल्यास ते बाद होण्याची शक्‍यता असते. मर्यादित कोट्यामुळे अनेकांपुढे ही अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे खासगी वाहनचालकांप्रमाणेच या वाहनांसाठी असलेल्या कोट्याची मर्यादा पन्नासपर्यंत करावी आणि एक एक दिवसाऐवजी महिन्याभराचा कोटा खुला करावा, अशी मागणी शहरातील ड्रायव्हिंग स्कूलचालकांकडून करण्यात येत आहे. 

Web Title: pune news pune RTO 16 vehicles quota per day for online license