पुणे-सातारा महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी

महेंद्र शिंदे
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

खेड-शिवापूर (पुणे): सलग आलेल्या सुट्टयांमुळे पुणे-सातारा महामार्गावर आज (शुक्रवार) सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी आहे. खेड-शिवापूर टोल नाक्यापासून सुमारे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीत अडकल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.

प्रजासत्ताक दिनाला लागून सलग आलेल्या सुट्टयांमुळे नागरीक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. त्यामुळे पुणे-सातारा रस्त्यावर शुक्रवारी सकाळपासून वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. खेड-शिवापूर टोल नाक्यापासून बंगला चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

सातारा बाजूकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आल्याने टोल नाक्याच्या दहा लेनही कमी पडत आहेत. त्यातच टोल प्रशासनाची यंत्रणा गतिमान नसल्याने वाहनांच्या रांगा वाढत आहेत. या वाहतूक कोंडीत अड़कावे लागल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रांगा वाढल्याने टोल फ्री
टोल नाक्यावरील वाहनांची रांग वाढत असल्याने टोल प्रशासनाने अर्धा तास वाहने टोल फ्री सोडली. त्यामुळे या टोल फ्री अर्ध्या तासात रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी झाली.

Web Title: pune news pune satara highway traffic jam