पुणे ते सावंतवाडी रेल्वेची विशेष गाडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जुलै 2017

पुणे - गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुणे ते सावंतवाडी या मार्गावर विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी १८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या दरम्यान चालणार असून, पुणे-सावंतवाडी-पुणे अशा एकूण आठ फेऱ्या होणार आहेत.

पुणे स्टेशनवरून दर शुक्रवारी सायंकाळी चार वाजून ३५ मिनिटांनी ही गाडी सुटेल. ती शनिवारी पहाटे चार वाजून २० मिनिटांनी सावंतवाडीला पोचेल. सावंतवाडी येथून दर सोमवारी सकाळी आठ वाजता सुटणार असून, रात्री नऊ वाजून २५ मिनिटांनी पुण्यात दाखल होईल. 

या गाडीला लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड थांबे देण्यात आले आहेत

Web Title: pune news pune to sawantwadi special railway