विद्यापीठ अधिसभेसाठी २१ जानेवारीला मतदान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभेच्या प्राचार्य प्रतिनिधी मतदारसंघातील तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित सात जागा, विद्यापीठ प्राध्यापकांच्या तीन आणि महाविद्यालयीन प्राध्यापक प्रतिनिधीच्या २० जागांसाठी २१ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्याची मतमोजणी २३ जानेवारी रोजी होईल.

इंदापूर येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ. बाबा सांगळे आणि नाशिक जिल्ह्यातील हरसूल येथील एका महाविद्यालयाचे प्राचार्य बिनविरोध झाले आहे. विद्या परिषदेच्या आठ जागांसाठीदेखील निवडणूक होणार आहे.

विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळांच्या १८३ जागांसाठी निवडणूक होणार होती; परंतु विज्ञान तंत्रज्ञान विद्याशाखेची सहा अभ्यास मंडळे, ‘वाणिज्य’चे अकरा, मानव्य विद्याशाखेचे पाच आणि आंतरविद्याशाखेचे दोन अभ्यास मंडळाची जागा बिनविरोध झाली आहे. प्रत्येक अभ्यास मंडळ हे तीन सदस्यांचे असते. त्यामुळे सुमारे एकशे अकरा जागांसाठी मतदान होईल.

Web Title: pune news pune university