वाघोबाचे पट्टे अन्‌ दिमाखदार मोर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

पुण्याच्या विद्यार्थ्याची प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या लोगोवर मोहोर

पुणे - वाघोबाचे पट्टे आणि मोराची दिमाखानं वळलेली मान, असं सुंदर रेखाचित्र पुण्याच्या फाइन आर्टच्या विद्यार्थ्यानं रेखाटलं आणि अशा प्रकारच्या सुमारे पन्नासावर रेखाचित्रांमध्ये पहिला क्रमांक मिळवत महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या लोगोचा मान मिळविला.

‘महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वाघ आणि मोराला या लोगोत मी स्थान दिले, त्यातून त्यांच्या संवर्धनाची गरज मला स्पष्ट करायची होती,’ असे मनोगतही या विद्यार्थ्याने व्यक्त केले.

महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला स्वतंत्र लोगोची गरज होती. त्यासाठी या प्राधिकरणाचे सदस्य आणि ज्येष्ठ सर्पतज्ज्ञ नीलिमकुमार खैरे यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार पुण्यातील भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्टच्या विद्यार्थ्यांसाठी एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात पन्नास विद्यार्थ्यांनी निसर्गावर आधारित विविध लोगो तयार केले. त्यात प्रथम क्रमांक प्रदीपकुमार देसाई याने मिळविला असून, प्राधिकरणाच्या अधिकृत पत्रांसह सर्व ठिकाणी तो लोगो वापरण्यास नुकतीच सुरवात झाली आहे.  देसाई याला सहा हजार रुपयांचे पारितोषिक प्राधिकरणातर्फे देण्यात आले असून, ते खैरे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. तसेच दुसरा क्रमांक आकाश झंवर (चार हजार रुपये), तिसरा क्रमांक पृथ्वी चौधरी (तीन हजार रुपये) यांना मिळाला. विद्यार्थ्यांनी आपली निरीक्षणशक्ती वाढवावी, असे आवाहन खैरे यांनी या वेळी केले तसेच तुमच्यापैकी कोणीतरी एक दिवस वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड म्हणजेच विश्‍वप्रकृती निधीचा लोगो बनवेल, अशी खात्रीही व्यक्त केली. प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या अनुपमा पाटील यांनी केले, तर जगदीश खैरे यांनी आभार मानले. प्रा. मुग्धा काळे आणि पल्लवी मेश्राम यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन प्रा. संजय भालेराव यांनी केले.

Web Title: pune news pune zoo logo