नावीन्यपूर्ण संकल्पनांबरोबरच वापराबाबत जनजागृतीही हवी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

पुणे - ""तंत्रज्ञानात केवळ प्रगती करून चालणार नाही, तर समाजासाठी त्याचा योग्य वापर कसा करावा, याबद्दल जागृतीची आवश्‍यक आहे. त्यामुळे आगामीकाळात तंत्रज्ञानाबरोबरच विविध क्षेत्रात प्रगती करताना त्यातील नावीन्यपूर्ण संकल्पनांबरोबरच त्याच्या वापराबाबत जनजागृतीवर भर दिला पाहिजे,'' असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. 

पुणे - ""तंत्रज्ञानात केवळ प्रगती करून चालणार नाही, तर समाजासाठी त्याचा योग्य वापर कसा करावा, याबद्दल जागृतीची आवश्‍यक आहे. त्यामुळे आगामीकाळात तंत्रज्ञानाबरोबरच विविध क्षेत्रात प्रगती करताना त्यातील नावीन्यपूर्ण संकल्पनांबरोबरच त्याच्या वापराबाबत जनजागृतीवर भर दिला पाहिजे,'' असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. 

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाने (सीआयआय) दोन दिवसीय सहाव्या "ग्रीनको समिट 2017'चे आयोजन केले आहे. याचे उद्‌घाटन डॉ. माशेलकर यांच्या उपस्थितीत झाले. "ग्रीनको समिट'चे अध्यक्ष प्रदीप भार्गव, सीआयआयच्या अध्यक्षा शोबना कामिनेनी, जमशेद गोदरेज, अनिल सिन्हा उपस्थित होते. 

डॉ. माशेलकर म्हणाले, ""देशाचा विकासदर उंचावत असताना आपले कार्बन फुटप्रिंट हे चीनच्या तुलनेत 78 टक्‍क्‍यांनी कमी आहे. भविष्यातही पर्यावरणपूरक शाश्‍वत विकासावर भर देणे महत्त्वाचे ठरणार आहे. विविध क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) हे "मॉडेल' यशस्वी ठरेल. तसेच देशाने तंत्रज्ञानात नेतृत्व मिळविले आहेच, परंतु आता औद्योगिक क्षेत्रासह इतर क्षेत्रातही नेतृत्व मिळविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी पुरेसा निधी आणि सक्षम धोरणाची जोड हवी.'' 

विज्ञानात अशक्‍य असे काहीच नसल्याचे सांगत डॉ. माशेलकर म्हणाले, """स्टार्ट अप'मध्ये संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही गुंतवणूक करता आणि अवघ्या काही दिवसांत त्याच्या यशाचे आणि अपयशाचे चित्र स्पष्ट होते. परंतु विज्ञानात तसे नाही, विज्ञानात नवनव्या शोधासाठी तुम्ही आज गुंतवणूक केल्यास, त्याच्या यशाचे चित्र स्पष्ट होण्यासाठी काही वर्ष प्रतीक्षा करावी लागते.'' 

कामिनेनी म्हणाल्या, ""पर्यावरणपूरक शाश्‍वत विकासाशी संलग्न बदल वैद्यकीय क्षेत्रानेही स्वीकारायला हवेत आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.'' पर्यावरणपूरक विकास साधत प्रगतीच्या दिशेने यशस्वी वाटचाल करणाऱ्या कंपन्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. तसेच पर्यावरण आणि विकासाची सांगड घालणाऱ्या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशनही झाले. 

Web Title: pune news Raghunath Mashelkar