पुणे जिल्ह्यात जुलैमध्ये आतापर्यंत  सरासरीच्या 106 टक्के पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

पुणे - जिल्ह्यात जुलैमध्ये आतापर्यंत सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. यात सर्वाधिक पाऊस मावळ तालुक्‍यात झाला असला तरी, जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड तालुक्‍यांमध्ये अद्याप पावसाने सरासरी गाठली नसल्याचे खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

पुणे - जिल्ह्यात जुलैमध्ये आतापर्यंत सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. यात सर्वाधिक पाऊस मावळ तालुक्‍यात झाला असला तरी, जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड तालुक्‍यांमध्ये अद्याप पावसाने सरासरी गाठली नसल्याचे खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

पुण्यात 12 जूनला मॉन्सून दाखल झाला. त्यानंतरच्या आठवड्यात पावसाने शहरासह जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. जूनअखेर पावसाने सरासरी ओलांडली. जूनमध्ये जिल्ह्यात 139.9 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा 147 टक्के (206.2 मिलीमीटर) पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये सुरवातीचे काही दिवस पावसात खंड पडला होता. त्यामुळे मावळ, मुळशी, भोर, वेल्हे असे डोंगरी भागातील जिल्हे वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्‍यांमध्ये फक्त ढगाळ वातावरण होते. मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण तयार झाल्याने गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरवात झाली. 

आठवडाभर पडलेल्या दमदार पावसाने जुलैची सरासरी ओलांडली, अशी माहिती कृषी हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. 

पुणे जिल्ह्यात 1 जुलैपासून आतापर्यंत 305.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या महिन्यात जिल्ह्यात सरासरी 286.6 मिलीमीटर पाऊस पडतो. सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात 106 टक्के पाऊस पडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

दृष्टिक्षेपात जुलैमधील पाऊस 
तालुका ... सरासरी पाऊस (मिलीमीटरमध्ये) ... प्रत्यक्ष पाऊस (मिलीमीटर) ... सरासरीच्या तुलनेत टक्केवारी 
पुणे शहर .... 168.9 ............................ 132.7 ........................ 78.6 
हवेली ........ 168.9 ........................... 162.8 ......................... 96.4 
मुळशी ........ 680.1 .......................... 940.6 ......................... 138.3 
भोर ........... 381.7 .......................... 505.1 ......................... 132.3 
मावळ ......... 498.4 ......................... 1049.3 ....................... 210.5 
वेल्हे .......... 1047.4 ....................... 690 ............................ 65 
जुन्नर .......... 250.6 .......................... 416.1 ........................ 166 
खेड ........... 295.2 .......................... 186.4 ......................... 295.2 
आंबेगाव ...... 265.3 .......................... 226.4 ......................... 85.3 
शिरूर .......... 74.4 ............................ 45.1 ........................... 60.6 
बारामती ........ 56.7 ............................ 40.4 ........................... 71.3 
इंदापूर .......... 63 ............................... 22.1 ........................... 35.1 
दौंड ............ 60.2 ............................ 20.9 ........................... 34.7 
पुरंदर .......... 110.7 ........................... 42.6 ........................... 38.5 

Web Title: pune news rain