पावसाची पुन्हा दमदार हजेरी 

पावसाची पुन्हा दमदार हजेरी 

पुणे - दीर्घकाळ विश्रांती घेतलेल्या नैर्ऋत्य मौसमी पावसाने (मॉन्सून) शहर आणि परिसरात मंगळवारी पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. शहरात संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 19 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. शहरात पुढील तीन दिवस पावसाच्या काही सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 

शहर आणि परिसरात सोमवारी रात्रीपासून दमदार पावसाला सुरवात झाली. सोमवारी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत 8.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत नऊ मिलिमीटर पाऊस झाल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. शहरात मंगळवारी सकाळपासून पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. दुपारपर्यंत पावसाचा जोर जास्त असल्याने रस्त्यांवरून पाणी वाहून लागले होते. ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीचा वेग कमी झाला होता. दुपारी पावसाने विश्रांती घेतले होती. मात्र रात्री सात वाजल्यानंतर पुन्हा पावसाच्या सरी पडू लागल्या. 

झाडांच्या फांद्या पडल्या 
शहरातील कोथरूड, सॅलिसबरी पार्क, सातारा रस्ता या भागांत पावसामुळे झाडाच्या फांद्या पडल्याच्या पंधरा घटना घडल्या, अशी माहिती अग्निशामक दलातील जवानांनी दिली. 

घरात पाणी शिरले 
शहरात दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवरून वाहणारे पाणी वेगवेगळ्या भागात शिरल्याची माहिती पुढे आली आहे. पाटील इस्टेट झोपडपट्टीतील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले, तर बाणेर येथील आझाद गणपती मंदिरातील झोपडपट्टीमधील पंधरा ते वीस झोपड्यांमध्ये ड्रेनेजचे पाणी शिरल्याची तक्रार तेथील नागरिकांनी केली. 

पावसाचा अंदाज 
शहर आणि परिसरात येत्या शुक्रवार (ता. 22) पर्यंत पावसाच्या काही सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यानंतर शनिवार (ता. 23) ते सोमवार (ता. 25) पर्यंत काही भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यताही वर्तविली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com