पुणे: चार धरणांत मिळून 0.12 टीएमसीने वाढ

राजेंद्रकृष्ण कापसे
मंगळवार, 27 जून 2017

पुणे - शनिवार व रविवारी झालेल्या पावसामुळे खडकवासला व पानशेत धरणांच्या पाणीसाठ्यात आज (मंगळवारी) सकाळी सहा वाजता 0.12 टीएमसी (0.38 टक्के) वाढ झाल्याचे दिसून आले. धरणात झालेली ही वाढ किरकोळ असून, शहराला दररोज 0.40 टीएमसी पाण्याची गरज असते.

चारही धरणांत झालेली वाढ मागील 24 तासांत झालेल्या पावसामुळे झाली आहे. टेमघर येथे 50, पानशेत येथे 50, वरसगाव 49 तर खडकवासला क्षेत्रात 19 मिलिमीटर पाऊस पडला आहे. एक जूनपासून टेमघर 316, पानशेत 246, वरसगाव येथे 246 आणि खडकवासला 99 मिलिमीटर पाऊस पडला आहे. यामुळे, पानशेत धरणात 0.10 तर खडकवासला धरणात 0.02 ने वाढ झाली आहे. 

मंगळवारी सकाळी चारही धरणात मिळून 2.88 टीएमसी, म्हणजे 9.85 टक्के पाणीसाठा जमा झालेले आहे. मागील वर्षी 27 जून रोजी चारही धरणांत मिळून 1.55 टीएमसी म्हणजे 5.33 टक्के पाणी शिल्लक होता.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
माण: बोअरवेलमध्ये पडलेल्या मंगेशचा अखेर मृत्यू
सलाहुद्दीनला ठरविले जागतिक दहशतवादी​
सर्जिकल स्ट्राइकवर एकही प्रश्‍न नाही: नरेंद्र मोदी​
मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखणार​
शाहू कार्यात तंत्रज्ञानाधारित रोजगाराची बीजं - डॉ. रघुनाथ माशेलकर​
३१ दिवस, पावणे चारशे तास आणि ४६ हजार पोळ्या​

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune news rain in Khadakwasla dam area