राज्यात आज, उद्या  पावसाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

पुणे - राज्यात येत्या शनिवारी आणि रविवारी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शनिवारी विदर्भ, मराठवाड्यात मुसळधारेची; तर रविवारी कोकण व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्‍यता आहे. 

बंगालच्या उपसागरात वायव्य भागात ओडिशाच्या किनाऱ्यालगत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून 9.5 किलोमीटर उंचीवर वाहणाऱ्या चक्राकार वाऱ्यामुळे पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणासह देशात ढगांची गर्दी होऊ लागली आहे. यामुळे दोन दिवस विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

शुक्रवारी रात्री विदर्भ, मराठवाड्यात सुरू होणारा पाऊस, दोन दिवस धुव्वाधार बरसण्याची शक्‍यता आहे. शनिवारी विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्‍यता आहे. रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला असून, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्‍यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. 

राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत असतानाच शनिवारपासून पुण्यात पाऊस वाढण्याची शक्‍यता आहे. रविवारी पुण्यात थांबून- थांबून पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. शुक्रवारी शहरात असलेल्या ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली होती. 

Web Title: pune news rain weather