बारा नीलगाईंचे नव्या खंदकात स्थलांतर 

बारा नीलगाईंचे नव्या खंदकात स्थलांतर 

कात्रज - राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या विकास आराखड्यानुसार उभारण्यात आलेल्या नवीन खंदकात बारा नीलगाईंना महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत स्थलांतरित करण्यात आले. 

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या वीस वर्षांच्या विकास आराखड्याला चार वर्षांपूर्वी मंजुरी दिल्यानंतर चार टप्प्यांतील या कामाला सुरवात झाली होती. जुने वन्यप्राणी व प्राणिसंग्रहालयात नव्याने समाविष्ट होणाऱ्या प्राण्यांसाठी खंदकांच्या उभारणीचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. त्याच कामाचा भाग असलेल्या नीलगाईंच्या खंदकाचे काम नुकतेच पूर्ण झाले. सुयोग्य नैसर्गिक अधिवास असलेल्या एक एकर क्षेत्रफळाच्या विस्तीर्ण खंदकात सोमवारी वसुबारसेच्या मुहूर्तावर या गाईंना सोडण्यात आले.

या वेळी महापौरांसह मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव, कार्यकारी अभियंता सुधीर कदम, स्थानिक नगरसेवक वसंत मोरे, युवराज बेलदरे, स्मिता कोंढरे यांच्यासह पशुधन पर्यवेक्षक दीपक धुमाळ, मनोज जाधव, मुख्य पशुपालक श्‍यामराव खुडे, कौशिक काशिकर हे उपस्थित होते. नीलगाईंसाठी प्राणिसंग्रहालयात वनसदृश नैसर्गिक अधिवास निर्मितीसाठी सुसंगत देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यांच्या जैविक सवयीनुसार मुक्तसंचार, दिवस व रात्रीची विश्रांती घेण्यासाठीचे शेडनी सज्ज असलेले प्रशस्त खंदक उभारण्यात आल्याची माहिती डॉ. राजकुमार जाधव यांनी दिली. प्राणिसंग्रहालयाचा विकास मुदतीत पूर्ण करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या वतीने सुरू असल्याचे अशोक घोरपडे यांनी सांगितले, तर विकासासाठी लागणारा निधी वेळेत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महापालिका प्राधान्याने करेल, अशी ग्वाही महापौर टिळक यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com