हृदयनाथ मंगेशकर यांना 'पं. राम मराठे स्मृती पुरस्कार'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

पुणे - पुणे भारत गायन समाजाचा "पं. राम मराठे स्मृती पुरस्कार' ज्येष्ठ गायक, संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर झाला आहे.

पुणे - पुणे भारत गायन समाजाचा "पं. राम मराठे स्मृती पुरस्कार' ज्येष्ठ गायक, संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर झाला आहे.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमात शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते सोमवारी (ता. 9) सायंकाळी सात वाजता या पुरस्काराचे वितरण होणार आहे. गायिका उषा मंगेशकर, गायक पं. सत्यशील देशपांडे, संगीत संयोजक अमर हळदीपूर हे या वेळी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, दृकश्राव्य माध्यमातून गायिका लता मंगेशकर रसिकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष डॉ. शैला दातार यांनी सोमवारी दिली.

Web Title: pune news ram marathe smruti award goes to hridaynath mangeshkar