एकबोटे, भिडे यांना अटक करा -  रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

पुणे - कोरेगाव भीमा येथील दंगल पूर्वनियोजित असल्याचे पुरावे पोलिस प्रशासनाकडे आहेत. त्यामुळे या दंगलीमागील मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना वाचविण्याचे कोणतेही काम केंद्र किंवा राज्य सरकारकडून होत नाही. एकबोटे आणि भिडे यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. 

पुणे - कोरेगाव भीमा येथील दंगल पूर्वनियोजित असल्याचे पुरावे पोलिस प्रशासनाकडे आहेत. त्यामुळे या दंगलीमागील मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना वाचविण्याचे कोणतेही काम केंद्र किंवा राज्य सरकारकडून होत नाही. एकबोटे आणि भिडे यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. 

ते म्हणाले, ""दोनशे वर्षपूर्तीमुळे कोरेगाव भीमा विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी 2 ते 3 लाख लोक येणार होते; परंतु त्यापूर्वीच सणसवाडी, वढू बुद्रूक, कोरेगाव भीमासह अन्य गावांनी बंद पाळण्याचा निर्णय का घेतला? वढू बुद्रूक येथे समाधिस्थळाची तोडफोड झाल्यानंतर पोलिस बंदोबस्त ठेवला असता तर हा अनर्थ टळला असता; परंतु गावोगावी बैठका घेऊन ग्रामपंचायतीकडून लेखी पत्र काढून बंद पाळण्यात आला. यावरून या दिवशी दंगल करण्याचा पूर्वनियोजित कट असल्याचे दिसून येते. त्याचे पुरावे पोलिस प्रशासनाकडे आहे. त्यामुळे एकबोटे आणि भिडे यांना तातडीने अटक करावी.'' केवळ मुख्यमंत्री व पंतप्रधानांसोबत फोटो आहेत, म्हणून त्यांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, याच्याशी मी सहमत नाही. न्यायालयीन चौकशीमध्ये सत्य समोर येणार आहे, असेही ते म्हणाले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली आहे. समन्वय समितीच्या अहवालामध्येही याचा उल्लेख केलेला आहे. छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गणपत गायकवाड यांच्या समाधिस्थळाच्या सुशोभीकरणासाठी खासदार निधीतून प्रत्येकी 25 लाख, असे एकूण 50 लाख रुपये देणार आहे,'' असेही आठवले यांनी सांगितले. 

मंत्रिपद घालविण्यासाठी ऐक्‍याचे प्रयत्न 
जिग्नेश मेवानी हे आंबेडकरवादी असतील तर त्यांनी "लाल सलाम' न म्हणता "जय भीम' म्हटले पाहिजे. प्रक्षोभक भाषणे करून सामाजिक व जातीय तणाव वाढवू नये. कोरेगाव भीमा येथील दंगलीशी मेवानीच्या भाषणाचा काहीही संबंध नाही. सत्ता काबीज करण्यासाठी सर्व रिपब्लिकन नेत्यांनी एकत्र आले पाहिजे. रिपब्लिकन ऐक्‍यामुळे समाजहित होत असेल तर माझा पाठिंबा आहे; परंतु माझे मंत्रिपद घालविण्यासाठी ऐक्‍याचे प्रयत्न केले जात आहे. आणखी दहा वर्षे मी मंत्री राहणार असल्याचा टोलाही रामदास आठवले यांनी लगावला.

Web Title: pune news ramdas athawale koregaon bhima