ड्रेनेजलाइन व झाकणांची दुरुस्ती करा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

पुणे - ओढे, नाल्यांपाठोपाठ पावसाळी गटारे आणि सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या (ड्रेनेजलाइन), त्यावरील झाकणे दुरुस्तीची कामे करण्याच्या सूचना महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना रविवारी देण्यात आल्या. त्यामुळे पावसाळी गटरांमधील गाळ काढणे आणि धोकादायक झाकणांची दुरुस्ती सुरू असल्याचे सांगण्यात आले. या कामांमध्ये सुमारे पाचशे धोकायदाक झाकणांची कामे करण्यात येतील, असेही महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील ओढे, नाले आणि पावसाळी गटारांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची कामे दुर्लक्षित राहात असल्याच्या तक्रारी आहेत. या वाहिनींची कामे न झाल्याने पावसळ्यात पाणी तुंबण्याची शक्‍यता असते; तसेच सिमेंट आणि लोखंडी जाळ्यांच्या झाकणांची दुरवस्था झाली असून, सिमेंटची झाकणे मोडकळीस आली आहेत. त्यात रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्यास अपघाताची भीती आहे. अशा झाकणांमुळे गेल्या वर्षी पावसाळ्यात अपघात झाल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील सुमारे दोन हजार झाकणांची पाहणी करून, त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार दुरुस्तीही झाली होती, मात्र, आता पुन्हा त्याची दुरवस्था झाल्याच्या तक्रारी आहेत. 

महापालिकेच्या पथविभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत म्हणाले, ""सांडपाणी वाहिन्या आणि त्यांच्या झाकणांच्या दुरुस्तीची कामे क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर सुरू आहेत. ती पावसाळ्यापूर्वी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये ही कामे वेगाने होणार आहेत. धोकादायक झाकणांची देखभाल-दुरुस्ती प्राधान्याने करण्यात येत आहे.'' 

लोकवस्त्यांमधील कामांना प्राधान्य 
ओढे आणि नाल्यांमधील गाळ, कचरा काढण्याच्या कामांना वेग आला असून, ज्या भागातील नाले धोकादायक स्थितीत आहेत त्या नाल्यांची पाहणी करून आवश्‍यक ती कामे करण्यात येत आहेत. विशेषत: लोकवस्त्यांमधील कामे प्राधान्याने हाती घेतली आहेत. दुसरीकडे, दरवर्षी नगर रस्ता परिसरातील घरांमध्ये पावसाळ्यात पाणी शिरण्याच्या घटना घडत असतात. त्या ठिकाणी उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे महापालिकेचे उपायुक्त विजय दहिभाते यांनी सांगितले. 

Web Title: pune news Repair drainage lines pmc