लोकोपयुक्‍त कामे करणे हीच लोकप्रतिनिधींची जबाबदारी - गाडगीळ

पुणे कॅन्टोन्मेंट कार्यालय - आमदार अनंत गाडगीळ यांच्या आमदार निधीतुन देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेची चावी पुणे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडे देताना गाडगीळ. समवेत डॉ.डी.एन.यादव, अतुल गायकवाड यांच्यासह कॅन्टोन्मेंटचे अधिकारी व पदाधिकारी.
पुणे कॅन्टोन्मेंट कार्यालय - आमदार अनंत गाडगीळ यांच्या आमदार निधीतुन देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेची चावी पुणे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडे देताना गाडगीळ. समवेत डॉ.डी.एन.यादव, अतुल गायकवाड यांच्यासह कॅन्टोन्मेंटचे अधिकारी व पदाधिकारी.

पुणे - 'नागरिकांसाठी उपयुक्त वस्तू देणे किंवा काम करणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारीच आहे. सर्वसामान्य नागरिकांची कामे करून त्यांना दिलासा देण्यावरच माझा भर आहे,'' असे मत आमदार अनंत गाडगीळ यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या अग्निशामक दलास गाडगीळ यांच्या आमदार निधीतून रुग्णवाहिका देण्यात आली. त्याचा लोकार्पण सोहळा कॅंटोन्मेंटच्या आवारात पार पडला. बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव, सदस्य विनोद मथुरावाला, अशोक पवार, दिलीप गिरमकर, डॉ. किरण मंत्री, प्रियांका श्रीगिरी, रूपाली बिडकर, राजाभाऊ चव्हाण, शशी पुरम आदी उपस्थित होते.

गाडगीळ म्हणाले, 'सर्व लोकप्रतिनिधींनी लोकोपयोगी कामांवर अधिक भर देण्याची गरज आहे. विशेषतः शहरातील नागरिकांची नेमकी गरज ओळखून त्यादृष्टीने त्यांना ती वस्तू दिल्यास त्याचा फायदा होतो. कॅंटोन्मेंट परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी भविष्यात आणखी महत्त्वाच्या वस्तू लागल्यास त्याही आमदार निधीतून उपलब्ध करून देऊ.''

कॅंटोन्मेंटमध्ये भेडसावणारी पाण्याची गंभीर समस्या पवार यांनी गाडगीळ यांच्यासमोर मांडली. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी जलवाहिनी बदलणे आवश्‍यक असून, त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. डॉ. यादव व गायकवाड यांनी गाडगीळ यांचे आभार मानत कॅंटोन्मेंटमधील विकासकामांची माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com