रिक्षा स्टॅण्ड, बस थांब्यांवरही स्वच्छतेची गरज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

एसटी स्टॅंड, पीएमपी बस डेपो या ठिकाणी दिवसभर असणारी प्रवाशांची वर्दळ, गाड्यांची ये-जा, खाद्यपदार्थ विक्रेत्यांची लगबग अशा परिस्थितीतही स्वारगेट परिसरातील स्वच्छता चांगल्याप्रकारे राखली जात आहे. मात्र अजूनही रिक्षा स्टॅंड, बस थांबे, स्वच्छतागृह अशा काही ठिकाणी स्वच्छतेसाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे.        

पीएमपी आणि बस स्थानक परिसरात स्वच्छतेबाबत योग्य उपाययोजना राबविल्या जात आहेत. परिसरात स्वच्छता राखण्यासाठी राज्य परिवहन मंडळ, पीएमपी आणि महापालिका प्रशासन तिन्हींकडून स्वच्छता केली जाते. बस स्थानक परिसरात स्वच्छतेसाठी खासगी कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबत येथील डेपो व्यवस्थापक सुनील भोकरे म्हणाले, ‘‘एसटी बस स्थानक परिसरात स्वच्छतेसाठी आतापर्यंत ‘दिशा’ या खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. याअंतर्गत परिसरात झाडू मारणे, फरशी पुसणे आणि सुटीच्या दिवशी बस स्थानक पूर्णपणे धुऊन काढण्याची कामे केली जात असे. आता हे कंत्राट दुसऱ्या कंपनीला देण्यात आले आहे. या दरम्यान जमा केलेला कचऱ्याची महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून विल्हेवाट लावली जाते.’’ एकीकडे बस स्थानकाच्या प्रांगणात स्वच्छता राखली जात असताना, बाहेर काही ठिकाणी कचऱ्याचे छोटे-छोटे ढीग जमा असतात, तर स्वच्छतागृहांमध्येही पुरेशी स्वच्छता राखली जात नाही. पीएमपी बस डेपोबाबतही परिस्थिती काहीशी सारखीच आहे. डेपोच्या प्रांगणात पुरेशी स्वच्छता आहे. मात्र बाहेरील परिसरात काही ठिकाणी कचऱ्याचे छोटे ढीग जमलेले असतात.

Web Title: pune news rickshaw stand buss stop cleaning