रोकेम कचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी तंबी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

पुणे - आगीची घटना घडून १५ दिवस झाले तरीही रामटेकडी येथील रोकेम कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद आहे. त्यामुळे तो तातडीने सुरू करण्याबाबत महापालिकेने संबंधित कंपनीला तंबी दिली आहे. कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर होऊ नये, यासाठी योग्य काळजी घ्या, असे सांगत प्रकल्पाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करू नका, असे बजावले आहे. 

कचरा गोळा करण्यासाठी आणलेल्या एस्केव्हेटरला (जेसीबी) आग लागल्याने १५ दिवसांपासून हा प्रकल्प बंद आहे. आगीची घटना किरकोळ असल्याने चार दिवसांत तो सुरू केला जाईल, असे संबंधित कंपनी व्यवस्थापनाने महापालिकेला कळविले होते. प्रत्यक्षात अजूनही काम न झाल्याने तो बंद आहे. त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही.  

सुमारे ७०० टन क्षमतेच्या या प्रकल्पात सध्या ३०० ते ३५० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. ही क्षमता ५०० टनांपर्यंत नेण्याच्या दृष्टीने प्रकल्पात नवी यंत्रणा उभारण्याचे काम हाती घेतले जाणार होते; पण आगीमुळे नुकसान झाल्याचे सांगून त्याची दुरुस्ती सुरू झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. 
‘आग आटोक्‍यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच दुरुस्तीचे काम सुरू झाले होते; पण ते अजून पूर्ण झालेले नाही. पुढील आठ दिवसांत ते करण्याची सूचना कंपनीला केली आहे,’ असे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले. 

Web Title: pune news rokem garbage project