ग्रामीण उद्योजकांना जोडणार ‘महाखादी’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

पुणे - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे निमित्त साधत ‘महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळा’ने ‘महाखादी’ हा ब्रॅंड विकसित केला आहे. त्याचे उद्‌घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि प्रवीण पोटे (पाटील) यांच्या हस्ते मुंबईत झाले. महात्मा गांधी यांच्या ‘खादी’ या संकल्पनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘महाखादी’ ब्रॅंडची निर्मिती करण्यात आली आहे. त्याद्वारे राज्यभरात विखुरलेल्या ग्रामीण उद्योजकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

ग्रामीण भागातील उद्योजकांनी तयार केलेला माल उत्कृष्ट आणि दर्जेदार असूनही अनेकदा मालाचे पॅकेजिंग व ब्रॅंडिंग नसल्याने हा माल विकणे अडचणीचे होते. हीच अडचण लक्षात घेऊन मंडळाचे सभापती विशाल चोरडिया आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रिचा बागला यांच्या संकल्पनेतून या ब्रॅंडची निर्मिती केली आहे. 

मंडळाने अर्थसाह्य दिलेल्या उद्योजकांच्या उत्पादनांना व्यापक प्रमाणात बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हा ब्रॅंड विकसित केला आहे. यामुळे ग्रामीण भागातील उद्योजकांची उत्पादने एका ब्रॅंडखाली आल्याने त्या उत्पादनांची स्वतंत्र ओळख निर्माण होऊन उद्योजकांच्या आर्थिक उन्नतीला आणि ग्रामीण विकासाला चालना मिळणार आहे. या ब्रॅंडमध्ये ग्रामोद्योगातील १४ वस्तू समाविष्ट केल्या आहेत. खादी, मध, शोभेच्या वस्तू, ज्वेलरी, चर्मोद्योगातील वस्तू, औषधी साबण याचा त्याच समावेश आहे. राज्यातील पहिली ‘महाखादी शॉपी’ पुण्यातील शिवाजीनगर येथे सुरू करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून कळविण्यात आले आहे.

Web Title: pune news rural business connected mahakhadi