अनेकांचे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

पुणे - कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या "सकाळ ऑटो एक्‍स्पो 2017' ला रविवारी कारप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात प्री-ओन्ड कारची माहिती घेण्याबरोबर काहींनी कारचे बुकिंग करत एक्‍स्पोतील कारला आपली पसंती दिली. "सकाळ माध्यम समूह' आणि "मारुती ट्रू व्हॅल्यू'तर्फे आयोजिलेल्या या एक्‍स्पोत प्री-ओन्ड कारची उत्कृष्ट मॉडेल्स एकाच छताखाली पाहायला मिळाली. त्यातील वेगळे फीचर्स आणि डिझाइनही कारप्रेमींच्या पसंतीस उतरले.

एक्‍स्पोचा समारोप आज (ता. 28) झाला. एक्‍स्पोत प्री-ओन्ड स्मॉल कार्स, सेडान कार, हॅच बॅक कार अशा कितीतरी गाड्यांच्या किमती आणि ईएमआयसंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे कारप्रेमींना जाणून घेता आली. नवीन गाडी घेणे अनेकांना शक्‍य होत नाही. त्यांच्यासाठी प्री-ओन्ड कारचा पर्याय "सकाळ'ने या एक्‍स्पोतून सादर केला होता. गरज आणि बजेटमध्ये असलेल्या प्री-ओन्ड कारचे काहींनी थेट बुकिंग केले.
चौगुले इंडस्ट्रीज, साई सर्व्हिस, माय कार, द कोठारी व्हील्स, महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह, सेहगल ऑटो, एस. कुदळे कार्स, वंडर कार्स, मोटो ड्राइव्ह, एक्‍सेल ऑटोविस्ता या "मारुती'च्या डीलर्सचा एक्‍स्पोत सहभाग होता.
मारुती ट्रू व्हॅल्यूच्या प्री-ओन्ड कारची माहितीही येथे कारप्रेमींना मिळाली.

Web Title: pune news sakal auto expo 2017