गोष्टीच गोष्टी! धमाल गोष्टींची रंजक सफर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

पुणे - गोष्टी ऐकण्यातून मुलांची सर्जनशीलता, कल्पनाशक्ती वाढीस लागते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. अभ्यासापलीकडे मुलांच्या सर्वांगीण कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने "सकाळ वायआरआय यंग बझ'ने 3 व 4 फेब्रुवारी (शनिवार-रविवार) रोजी "सकाळ इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल' आयोजित केला आहे. विमाननगर फिनिक्‍स मार्केट सिटी येथे हा उत्सव होईल. यात आठ स्टोरी टेलर भन्नाट कथा सादर करणार आहेत. 

शॅडो व अन्य पपेट, कॉस्च्युम, पेपर स्टोरीज अशा विविध प्रकारांनी फेस्टिव्हलमध्ये कथा सादर होतील. प्लेग्रुप ते सीनियर केजीतील विद्यार्थ्यांना जुमायनी आरिफ (मलेशिया) आणि मेबल ली (सिंगापूर), पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्यांना हेलन नमाय आणि जॉन म्युकेनी नमाय (केनिया), चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्युंग आ किम (साउथ कोरिया), जीवा रघुनाथ (भारत) आणि आठवी व त्यापुढील विद्यार्थ्यांना लिलियन पॅंग (ऑस्ट्रेलिया), मारियान ख्रिस्तीनसन (डेन्मार्क) हे स्टोरी टेलर्स गोष्टी सांगणार आहेत. गोष्टींच्या एका सत्रासाठी प्रवेश मूल्य रु. 250 आहे. 

महोत्सवाच्या दोन्ही दिवशी सायंकाळी फिनिक्‍स मार्केट सिटी लिबर्टी स्क्वेअरमध्ये आठही स्टोरी टेलर्स आगळावेगळा "ग्रॅंड शोकेस' सादर करणार आहेत. सायंकाळी 4.30 ते 6 दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमासाठी रु. 250 शुल्क आहे. शुल्क भरून नोंदणी करणाऱ्या पहिल्या 500 जणांना "ग्रॅंड शोकेस'च्या प्रवेशिका मोफत देण्यात येणार आहेत. 

महोत्सवासाठी नोंदणी सुरू असून शाळा, कॉर्पोरेट आणि महाविद्यालयांना समूह नोंदणीदेखील करता येणार आहे. 

काय : इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल 
कधी : 3 फेब्रुवारी (शनिवार), 4 फेब्रुवारी (रविवार) 
केव्हा : बॅच 1 : दुपारी 12 ते 1.30 / बॅच 2 : दुपारी 2.30. ते 4.00 
कुठे : फिनिक्‍स मार्केट सिटी, विमाननगर, पुणे 
मर्यादित जागा - शनिवारची (ता.3 फेब्रुवारी) केवळ ग्रॅंड शोकेसची नोंदणी व फक्त रविवारची (ता.4 फेब्रुवारी) नोंदणी सुरू. 
शनिवार, रविवारची नोंदणी केवळ फिनिक्‍स मार्केट सिटी साउथ गेट येथे उपलब्ध आहे. 
संपर्क - 8805009395, 7773915566 किंवा व्हॉट्‌सऍप क्रमांक: 9146038033

Web Title: pune news sakal International Story Telling Festival