‘सकाळ ट्रॅव्हल मार्ट’ प्रदर्शन उद्यापासून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

पुणे - पर्यटनाविषयी पर्यटकांच्या मनातील सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे देणारे, ऑस्ट्रेलियापासून युरोपपर्यंत, काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, जगभरातील भ्रमंतीच्या पर्यायांची माहिती देणारे ‘सकाळ ट्रॅव्हल मार्ट २०१८’ हे प्रदर्शन येत्या शुक्रवार ते रविवार (ता. ९, १० व ११ फेब्रुवारी) दरम्यान महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर येथे आयोजित केले आहे. 

अमेरिका, जपान, युरोप, थायलंड , सिंगापूरसह, जम्मू काश्‍मीर, महाराष्ट्र, गुजरात येथील भटकंतीचे विविध पर्याय, उत्कृष्ट ठिकाणे पर्यटनप्रेमींना जाणून घेता येणार आहे. यामध्ये विविध टूर्स पॅकेजेसचे अनेक पर्याय देणाऱ्या कंपन्या सहभागी आहेत. प्रदर्शनात ५०हून अधिक कंपन्यांचे स्टॉल्स असून, किडस झोन आणि फूड्‌स स्टॉल असणार आहेत. 

तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात गुजरात स्टेट टुरिझम, रशिया पर्यटनाविषयी सगळी माहिती देणारे स्टॉल असे नवनवीन भटकंतीचे पर्याय हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहेत. कॅप्टन नीलेश हे प्रदर्शनाचे प्रायोजक असून, केसरी टूर्स, गिरिकंद ट्रॅव्हल्स, चौधरी यात्रा, मास्टर टूर्स व मॅंगो हॉलिडे हे सहप्रायोजक आहेत. प्रदर्शनात पर्यटनची हजारो ठिकाणे, तेथील अनुभव अशा अनेक गोष्टींची माहिती देणारे स्टॉल्स असणार आहेत.

 काय : सकाळ ट्रॅव्हल मार्ट २०१८
 कुठे : महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर, पुणे
 केव्हा : ९ फेब्रुवारी, १० फेब्रुवारी , ११ फेब्रुवारी 
 कधी : सकाळी ११.०० ते रात्री ९.००
 अधिक माहिती साठी संपर्क : ८३०८८४१००२, ७०५७३७५०९५
 प्रवेश व पार्किंग विनामूल्य 

गिरिकंद ट्रॅव्हल्स तर्फे ‘सकाळ ट्रॅव्हल्स मार्ट २०१८’ प्रदर्शन ठिकाणापर्यंत बसची नि:शुल्क जाण्या-येण्याची सोय केली आहे. 
नावनोंदणीसाठी संपर्क
औंध : ऐश्‍वर्या जोशी- ९६८९८९८९७२
बिबवेवाडी - अनुराधा खेडेकर - ८६६९६७७२३१
हडपसर - नीलेश कोल्हापूरकर - ८८०५४९३०७४
विमाननगर - सुरज गवस - ९७६३७२६१७४

Web Title: pune news sakal travels mart exhibition