"ससून'च्या आवारात थुंकलात तर दुप्पट दंड 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

पुणे - ससून रुग्णालयाच्या आवारात थुंकताय! सावधान! आता रुग्णालयाच्या आवारात तसेच रुग्णालयाच्या आतमध्ये कोठेही थुंकलात किंवा घाण टाकलीत तर तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागणार आहे. 

ससून रुग्णालयात येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच कर्मचारी वॉर्डमध्ये, भिंतींवर, आवारात थुंकत असल्याने रुग्णालयाचा परिसर अस्वच्छ राहतो. त्याची स्वच्छता करणेही अशक्‍य होते. याचा विचार करून "ससून' स्वच्छ राहण्यासाठी आवारात किंवा आत कोणीही थुंकताना आढळला तर त्याच्याकडून दुप्पट दंड आकारण्याचा निर्णय ससून अभ्यागत मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 

खासदार अनिल शिरोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत रुग्णालयाची स्वच्छता, सुरक्षा, विविध इमारतींची दुरुस्ती आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. या वेळी मंडळाचे सदस्य आमदार विजय काळे, आमदार जगदीश मुळीक, संभाजी पाटील, बागेश्री मंठाळकर, नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, डॉ. अजय तावरे, ससूनच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. 

ससून स्वच्छ ठेवण्यासाठी कायमस्वरूपी एक स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, नागरिक आणि सरकारच्या माध्यमातून निधी उभारण्यात येणार असल्याचे शिरोळे यांनी सांगितले. ससूनमधील निवासी वसतिगृह, कर्मचारी वसाहत तसेच जुन्या इमारतींच्या दुरुस्तीबाबत एक आराखडा तयार करून तो सार्वजनिक बांधकाममंत्र्यांना सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. "ससून'च्या अकरा मजली इमारतीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे खर्च होऊ शकला नाही, याबाबत बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. 

खासदार निधीतून सव्वादोन कोटी 
"ससून'च्या शवविच्छेदन विभागासाठी तसेच विविध प्रयोगासाठी आवश्‍यक असणाऱ्या "सिम्युलेशन'साठी खासदार अनिल शिरोळे यांच्या निधीतून सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.

Web Title: pune news Sassoon Hospital fine