..अन्यथा फसणवीस सरकार आणि मंत्र्यांचा अडवूनच बंदोबस्त करू

सासवड (ता. पुरंदर) ः येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या आंदोलनात बोलताना जिल्हाध्यक्ष जालींदर कामठे., शेजारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व समोर कार्यकर्ते, नागरीक.
सासवड (ता. पुरंदर) ः येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या आंदोलनात बोलताना जिल्हाध्यक्ष जालींदर कामठे., शेजारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व समोर कार्यकर्ते, नागरीक.

सासवड : खड्ड्यात महाराष्ट्र बुडाला हे खासदार सुप्रिया सुळे यांनी दाखवून दिल्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी पारदर्शक जबाबदारी पार पाडण्याएेवजी बेताल वक्तव्य केले. त्यात खरे मंत्री असाल तर रस्त्यावरचे खड्डे बुजवून कर्तृत्व दाखवा. पोपटपंची नको. अन्यथा फसणवीस सरकार आणि फसवणुक करणाऱया मंत्र्यांचा अडवूनच बंदोबस्त केला जाईल., असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी दिला.  

खासदार सुप्रिसा सुळे यांनी रस्त्यावरील खड्ड्यांचे सेल्फी घेतले व ते मंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठविले. काही फोटो वर्तमानपत्रात आले. त्याच्या मिरच्या पाटलांना इतक्या झोंबल्या की त्यांनी खासदार सुळेंवर टिका केली. त्याला उत्तर देण्यासाठी व त्यांचा, तसेच पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांचा निषेध करण्यासाठी आज सासवड (ता. पुरंदर) येथे जयप्रकाश चौकात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी श्री. कामठे बोलत होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण पुष्पराज जाधव, गौरी कुंजीर, यांच्यासह जिल्हा बँक संचालक प्रा. दिगंबर दुर्गाडे, सुदाम इंगळे, हेमंतकुमार माहूरकर, भैया खैरे, माणिक झेंडे, अमित झेंडे, ईश्वर बागमार, भानुदास जगताप, एम. के. गायकवाड, गणेश होले, अनिल वाडकर, कला फडतरे, बंडुकाका जगताप आदी मान्यवर व नागरीक उपस्थित होते.

केंद्रात व राज्यात सत्तेत असलेलेच लोक लाभार्थी आहेत आणि गरीब लोकांचे गुपचूप फोटो काढतात. त्यांच्या जाहीराती छापतात. या जाहीरात खर्चात कितीतरी शेतकऱयांचे कर्ज माफ झाले असते., असे सांगून श्री. कामठे म्हणाले., पुणे जिल्ह्यात 2 लाख 98 हजार शेतकऱयांनी आॅनलाईन कर्जमाफीसाठी अर्ज भरले. यातील फक्त 123 शेतकऱयांची कर्जमाफी झाली. त्यामुळे यांच्या कर्जमाफीचे हे अपयश आहे. यावेळी प्रा. दुर्गाडे, सुदाम इंगळे, माहूरकर यांनीही मनोगत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्तविक शिवाजी पोमण यांनी केले. तर आभार इश्वर बागमार यांनी मानले.  

राज्यमंत्री शिवतारेंचा पंचनामा करण्याची वेळ : सुदाम इंगळे
पुरंदर तालुक्यातील पिसर्वे व कितीतरी बंधाऱयांसाठी मी स्वतः सर्वेक्षण करुन घेतले. जिल्हा नियोजन समितीत खासदार सुप्रिया सुळे यांनी कित्येक कामे सुचविली. मात्र राज्यमंत्री विजय शिवतारे मंजूर यादी पुढे करुन मीच केले हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा पंचनामा करण्याची वेळ आली आहे., असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी जि.प.सदस्य सुदाम इंगळे म्हणाले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com