"सवाई'चा चेहरा होतोय तरुण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

पुणे - शास्त्रीय संगीताचा "स्वरयज्ञ' समजल्या जाणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात पतियाळा घराण्याच्या गायिका कौशिकी चक्रवर्ती, कुमार गंधर्वांचे नातू भुवनेश कोमकली, पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य महेश काळे, पं. ब्रिजभूषण काब्रा यांचे शिष्य देबाशिष भट्टाचार्य, संतूरवादनाची परंपरा जपणारे काश्‍मीरचे अभय सोपोरी, इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेले विजय राजपूत यांच्यासह श्रोत्यांमध्ये लोकप्रिय असलेले नव्या पिढीतील वेगवेगळे गायक- वादक आपली सेवा सादर करणार आहेत, त्यामुळे "सवाई'चा चेहरा अधिकाधिक तरुण होताना दिसत आहे. 

नोव्हेंबर महिना सुरू झाला, की "सवाई गंधर्व'मध्ये कोणकोणते कलाकार गायन- वादन सादर करणार, हा प्रश्‍न विचारला जातो. महाराष्ट्रासह परदेशांतील अनेक श्रोत्यांना याची उत्सुकता असते. या पार्श्‍वभूमीवर आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी यंदाच्या कलाकारांची नावे जाहीर केली. महोत्सवाचे यंदाचे 65वे वर्ष असून, जुन्या- नव्या पिढीतील 28 कलाकार महोत्सवात सहभागी होणार आहेत. यापैकी डॉ. विजय राजपूत, देबाशिष भट्टाचार्य, गायत्री जोशी, कुशल दास, तुषार दत्ता, अभय सोपोरी, प्राची शहा, पद्मा शंकर, सारंग कुलकर्णी हे प्रथमच "सवाई'च्या मंचावर येत आहेत. 

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे 13 ते 17 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. पहिल्या आणि चौथ्या दिवसाची महोत्सवाची वेळ दुपारी तीन ते रात्री दहा अशी आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाची वेळ दुपारी चार ते रात्री दहा; तर शेवटच्या दिवसाची सुरवात सकाळी पावणेबारा ते रात्री दहा अशी असेल. सकाळचे आणि दुपारचे राग ऐकण्याचा योग सहसा जुळून येत नाही. ती संधी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी श्रोत्यांना मिळणार आहे. हे यंदाच्या महोत्सवाचे आणखी एक वेगळेपण आहे, असे जोशी यांनी सांगितले. "जीएसटी'मुळे खुर्चीची सीझन तिकिटे एक हजार रुपयांनी, भारतीय बैठकीची सीझन तिकिटे दीडशे रुपयांनी, तर दररोजची तिकिटे पन्नास रुपयांनी वाढली आहेत, असेही ते म्हणाले. 

पहिला दिवस 
- मधुकर धुमाळ : सनई 
- डॉ. विजय राजपूत : गायन 
- देबाशिष भट्टाचार्य : स्लाइड गिटार 
- राजन-साजन मिश्रा : गायन 
- पं. हरिप्रसाद चौरासिया : बासरी 

दुसरा दिवस 
- भुवनेश कोमकली : गायन 
- कलारामनाथ : व्हायोलिन 
- कौशिकी चक्रवर्ती : गायन 
- पं. जसराज : गायन 

तिसरा दिवस 
- गायत्री जोशी-वैरागकर : गायन 
- कुशल दास : सतार 
- सम्राट पंडित : गायन 
- उल्हास कशाळकर : गायन 

चौथा दिवस 
- प्रा. तुषार दत्ता : गायन 
- पं. भजन सोपोरी, अभय सोपोरी : संतूर 
- उपेंद्र भट : गायन 
- आरती अंकलीकर-टिकेकर : गायन 
- प्राची शहा : कथक नृत्य 
- पद्मा तळवलकर : गायन 

पाचवा दिवस 
- महेश काळे : गायन 
- पद्मा शंकर : व्हायोलिन 
- सुधाकर चव्हाण : गायन 
- राजन कुलकर्णी, सारंग कुलकर्णी : सरोद 
- आनंद भाटे : गायन 
- उस्ताद शुजात खॉं : सतार 
- डॉ. प्रभा अत्रे : गायन

Web Title: pune news Sawai Gandharva Bhimsen Mahotsav