वालचंदनगरच्या पाठशाळेमध्ये भरला आठवडे बाजार...

राजकुमार थोरात
बुधवार, 14 मार्च 2018

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी येथील शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाची माहिती व्हावी, वजनाचे मोजमाप कळावे,पैशाची देवाण-घेवाण करता येण्यासाठी शाळेमध्ये आठवडे बाजाराच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

वालचंदनगर  - प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना व्यहवारज्ञानाची माहिती होण्यासाठी वालचंदनगर  (ता.इंदापूर) येथील  प्राथमिक पाठशाळेमध्ये  आठवडे बाजाराच्या उप्रकमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील २५० विद्यार्थ्यांना उपक्रमामध्ये सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी येथील शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाची माहिती व्हावी, वजनाचे मोजमाप कळावे,पैशाची देवाण-घेवाण करता येण्यासाठी शाळेमध्ये आठवडे बाजाराच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बाजाराच्या उपक्रमामध्ये शाळेतील  २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शाळेमध्ये येणारे बहुतांश विद्यार्थी शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची मुले असल्यामुळे मुलांनी शेतातुन टाॅमेटा,शेवगा,हरभरा, कांदे,मुळा,कोथींबिर, मेथी,पालक,मकेची कणसे,द्राक्षे आणली होती.तसेच व्यापाऱ्यांच्या मुलांनी विविध प्रकारच्या स्टेशनरीच्या वस्तु व्रिकीसाठी आणल्या होत्या.मुलांच्या पालकांनी  बाजारामध्ये खरेदीसाठी गर्दी केली होती. तसेच शाळेतील शंभर  विद्यार्थ्यांनी  टाकावूपासुन टिकावूच्या हस्तकलेच्या वस्तु तयार केल्या होत्या.हस्तकलेच्या वस्तुच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. आठवडे बाजाराचे उद्घाटन वालचंदनगर कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे वरिष्ठ  अधिकारी आनंद नगरकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष अमोल बर्गे,धीरज केसकर,हरिश्‍चंद्र डोळे, जे.के.झा,राहुल माने,शाळेच्या मुख्याध्यापिका विजया वाघमारे उपस्थित होते. 

Web Title: pune news school