स्वतंत्र कक्षाचा ज्येष्ठांना आधार

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पुणे -  घटना-१ : बिबवेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक दत्तू कसबे... वय वर्षे ८०. आयुष्यभर कष्ट करून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला... मात्र मुलाच्या लग्नानंतर सुनेकडून छळ सुरू झाला... एके दिवशी सुनेने घराबाहेर काढले... शेवटी त्यांनी मुलगा आणि सुनेला न्यायालयामार्फत नोटीस बजावली. स्वत:च्या मालकीच्या घरात राहू द्यावे, असे त्यांचे म्हणणे होते. ज्येष्ठ नागरिक कक्षात समुपदेशन केल्यानंतर मुलगा घर सोडून दुसरीकडे राहण्यास गेला; परंतु सून ऐकत नव्हती. शेवटी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

घटना २ : सोमवार पेठेतील शकुंतला आगरकर. वयाची सत्तरी ओलांडलेली. वृद्धापकाळात मुलगा आणि सुनेने घराबाहेर काढले. त्यामुळे त्या काही दिवस चर्चमध्ये आणि मुलीच्या घरी राहिल्या. स्वत:चे घर असूनही त्यांना घराबाहेर राहावे लागत होते. शेवटी त्यांनी ज्येष्ठ नागरिक कक्षात तक्रार दिली. त्यावर पोलिसांनी मुलगा आणि सुनेला बोलावून समजावून सांगितले; पण त्यांनी काही ऐकले नाही. त्यावर ज्येष्ठ नागरिक कक्षाकडून समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार पाठविण्यात आली. त्यानंतर मुलगा आणि सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केल्यामुळे ज्येष्ठांना हक्‍काचे व्यासपीठ मिळाले आहे. या कक्षात ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. ज्येष्ठांच्या तक्रारी सोडविणे आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी शहर पोलिस कटिबद्ध आहेत.  
- रश्‍मी शुक्‍ला, पोलिस आयुक्‍त 

या आहेत नुकत्याच घडलेल्या दोन प्रातिनिधिक घटना. पोलिस आयुक्‍तालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू झाल्यानंतर प्रथमच हे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला, सहआयुक्‍त रवींद्र कदम, गुन्हे शाखेचे अतिरिक्‍त आयुक्‍त प्रदीप देशपांडे, पोलिस उपायुक्‍त पंकज डहाणे आणि सहायक आयुक्‍त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक संजय निकम, सहायक निरीक्षक संपत पवार, जयश्री जाधव यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

कक्षातून समुपदेशन
कक्षाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या मुलांचे समुपदेशन करण्यात येत आहे; तसेच ज्येष्ठांच्या अडचणी ऐकून त्या सोडविण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात एक पोलिस अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली आहे. 

ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे प्राप्त तक्रारी (जानेवारी ते जुलै २०१७)

१६० एकूण तक्रार अर्ज
३१  समुपदेशन करून तक्रारी सोडविल्या
९७ अर्ज निकाली

Web Title: pune news Senior citizen