मोटारीने दुचाकीला ठोकरले; सासरा, सून जागीच ठार

नागनाथ शिंगाडे
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

तळेगाव ढमढेरे (पुणे) दुचाकीला मोटारीने मागून धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील दत्तात्रेय सोनबा भुजबळ (वय 52) व मोहिनी अतुल भुजबळ (वय 24, दोघे. रा. टेल्को कॉलनी, आंबेगाव बुद्रुक पुणे 46, मूळगाव टाकळसिंग, ता. आष्टी, जि. बीड) हे सासरा व सून असे दोघे जागीच ठार झाले. कासारी फाटा (ता. शिरूर) येथे चोविसावा मैलाजवळ पुणे-नगर रस्त्यावर आज (सोमवार) सकाळी ही दुर्घटना घडली. राजू सोनबा भुजबळ (रा. सणसवाडी, जि. बीड) यांनी शिक्रापूर पोलिसांत याबाबत फिर्याद दिली.

दत्तात्रेय भुजबळ हे सूनेसह दुचाकीवरून (एमएच 12 के एक्‍स 763) पुण्याहून बीडला चालले होते. चोविसावा मैलावर पुणे-नगर रस्त्याच्या कडेला ते दुचाकी उभी करून एका हॉटेलजवळ थांबले होते. चहापाणी घेऊन ते पुन्हा त्यांच्या दुचाकीवर बसत असताना पुण्याहून नगरकडे येणाऱ्या मोटारीने (एमएच 14 सी एक्‍स 7142) दुचाकीला जोरारदार धडक दिली व त्यानंतर ती मोटार समोरच्या झाडावर जाऊन आदळली. डोक्‍याला जबर मार लागल्याने वरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. मोटारमधील दोघेजण फरार झाले असून, याबाबत पुढील तपास शिक्रापूर पोलिस करीत आहेत.

Web Title: pune news shikrapur accident in pune nagar highway two killed