शेतात घाम गाळायचा अन् माती मोल व्हायच...

युनूस तांबोळी
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): शेतात घाम गाळायचा अन् मातीत सोनं पिकवायच, पिकलेले सोनं बाजारभावानं माती मोल व्हायच. अशीच काहितरी परीस्थीती सध्या शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात कोबी पिकाची झाली आहे. ठिबक वर पाण्याचे व्यवस्थापन करून, मल्चिंग पेपर बेड वरील कोबीचे दोन ते तिन किलोचे पिकवलेले गड्डे बाजारभावा अभावी जनावरांसमोर टाकावे लागत आहेत.

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): शेतात घाम गाळायचा अन् मातीत सोनं पिकवायच, पिकलेले सोनं बाजारभावानं माती मोल व्हायच. अशीच काहितरी परीस्थीती सध्या शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात कोबी पिकाची झाली आहे. ठिबक वर पाण्याचे व्यवस्थापन करून, मल्चिंग पेपर बेड वरील कोबीचे दोन ते तिन किलोचे पिकवलेले गड्डे बाजारभावा अभावी जनावरांसमोर टाकावे लागत आहेत.

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या पाण्याचे व्यवस्थापन करून कोबीचे पिक घेतले आहे. घोड व कुकडी नदिवरील कोल्हापूर बंधाऱ्यावरील पाण्यामुळे विविध भाज्यांची पिके घेतली जातात. अनेक शेतकरी जमीनीच्या मशागती करून कोबी पिकाचे नियोजन करण्यात आले होते. 65 ते 75 दिवसात निघालेल्या या पिकापासून मोठ्या प्रमाणात नफा मिळण्याची आशा या शेतकऱ्यांना होती. मशागती करून मल्चिंग पेपर व बेट तयार करून या पिकासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. युरोटो व सेंट जातीच्या कोबी पिकाचे रोप साधारण 60 पैसे ला उपलब्ध होत असते. हि रोपे आणण्यासाठी वाहतुकीला खर्च करावा लागतो. या पिकापासून योग्य उत्पादन मिळावे यासाठी औषधांची फवारणी करावी लागते. त्यासाठी लागणारा खर्च हा हजारो रूपयात असतो. यासाठी खुरपनी व इतर मजूरीचा खर्च मोठ्या प्रमाणात करताना शेतकरी कर्जाऊ रक्कम घेत असतात. त्यासाठी लागणारे भांडवल मोठ्या प्रमाणात उभे करताना शेतकरी पुरता कर्जाऊ होताना दिसतो. या पिकाच्या उत्पादनातून चांगला फायदा होतो अशीच धारणा या शेतकऱ्यांमध्ये असते. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात टाकळी हाजी, चांडोह, जांबूत, फाकटे, पिंपरखेड या परीसरात मोठ्या प्रमाणात कोबी पिकाचे उत्पादन घेण्यात आले होते. त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी चांगले व्यवस्थापन केल्याचे बोलले जात आहे. कोबी पिकाचे उत्पादन केल्यावर हा माल बाजारपेठेत नेल्यावर 1 ते 2 रूपये किलोने विकला जाऊ लागला. त्यात वाहतूकीचा खर्च निघेनासा झाला आहे. त्यानंतर ही शेतकरी हा माल पाठवत होते. त्यावेळी बाजारपेठेतिल दलाला कडून माल पाठवू नका, आलेला मालच पडून राहू लागला आहे. अशा सुचना येऊ लागल्या आहेत. त्यामुळे शेतकरी कोबी पिकात जनावरे सोडून देऊ लागले आहेत. कोबी पिकाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

शेतकरी बाजारभाव नसल्याने आर्थीक संकटात
शेतकरी हा कर्जाच्या माध्यमातून अडचणीत आहे. त्यात शेती व्यवसाय करत असताना मोठ्या प्रमाणात भांडवल उभे करून काळ्या मातीत काबाडकष्ट करत आहेत. कोणत्यातरी पिकात उत्पन्न मिळून आर्थीक स्थर वाढेल अशी आशा असताना शेतकरी बाजारभाव नसल्याने आर्थीक संकटात जाऊ पहात आहे. अशा शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक पोपटराव गावडे यांनी केली आहे.

Web Title: pune news shirur farmer agriculture vegetable market rate