स्त्रीयांना मान व सन्मानाची वागणूक द्या: प्रविण माने

नागनाथ शिंगाडे
गुरुवार, 8 मार्च 2018

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर, पुणे): कर्तुत्ववान महिलांचा आदर्श समाजाने डोळ्यासमोर ठेवून स्त्रीयांना मान व सन्मानाची वागणूक द्या, एक महिला कोणाचीतरी मुलगी, बहिण, बायको व आई असते याची जाणीव ठेवा, स्त्री शक्तीचा सन्मान राखणे हे आदर्श व सुसंस्कारित संस्कृतीचे लक्षण आहे. महिलांना आपुलकीने वागवा, महिलांना दिलेले आरक्षण हाच खरा स्त्रियांचा सन्मान आहे, असे मत पुणे जिल्हा परिषदेचे
बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांनी व्यक्त केले.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर, पुणे): कर्तुत्ववान महिलांचा आदर्श समाजाने डोळ्यासमोर ठेवून स्त्रीयांना मान व सन्मानाची वागणूक द्या, एक महिला कोणाचीतरी मुलगी, बहिण, बायको व आई असते याची जाणीव ठेवा, स्त्री शक्तीचा सन्मान राखणे हे आदर्श व सुसंस्कारित संस्कृतीचे लक्षण आहे. महिलांना आपुलकीने वागवा, महिलांना दिलेले आरक्षण हाच खरा स्त्रियांचा सन्मान आहे, असे मत पुणे जिल्हा परिषदेचे
बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांनी व्यक्त केले.

श्री क्षेत्र विठ्ठलवाडी (ता.शिरूर) येथे महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात श्री माने बोलत होते. जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल व विठ्ठलवाडी ग्रांमपंचायतीने आयोजित केलेल्या या मेळाव्याला तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटातील 16 गावातील सुमारे 5 हजार महिलांची उपस्थिती हे या मेळाव्याचे खास वैशिष्ट्ये ठरले.

श्री माने म्हणाले की, आजपर्यंत महिलांचा असा मेळावा तालुकास्तरावर कधी पाहायला नाही त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडणार असल्याचे श्री माने यांनी यावेळी जाहीर केले. विविध क्षेत्रातील दारे महिलांसाठी खुली असून, त्यांना त्यांचे क्षेत्र निवडण्यासाठी सामाजिक स्वातंत्र्य द्या, आज पुरूष उन्हात आहेत व महिला सावलीत आहेत. अशीच सावली महिलांना आगामी काळातही द्यावी असे आवाहन श्री माने यांनी केले. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक निवृत्तीअण्णा गवारे, माजी सभापती मंगलदास बांदल, जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल व सविता बगाटे, सविता गवारे, मनिषा गवारे आदींची भाषणे झाली.

यावेळी पंचायत समितीच्या सदस्या अर्चना भोसुरे व विक्रम पाचुंदकर, बाजार समितीचे उपसभापती विश्वास ढमढेरे, संचालक राहूल गवारे, विकास शिवले, उपसरपंच बाबाजी गवारे, हिरामन गवारे, सोपान गवारे, गटविकास अधिकारी संदीप जठार, ग्रामसेवक दादाभाऊ नाथ, विविध गावचे सरपंच, ग्रांमपंचायतीचे सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सुनंदा भोस यांचे व्याख्यान झाले. महिला दिनानिमित्त फेटे बांधून महिलांनी गावातून सवाद्य भव्य रॅली काढली.

दरम्यान, महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनानिमित्त रेखा बांदल यांच्यातर्फे 16 गावातील महिला सरपंचांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच गटातील 16 गावातील प्रत्येक घराच्या दरवाजावर कुटुंबातील मुलींच्या नावाचा फलक लावण्याचा शुभारंभ झाला.गावातील 100 विधवा महिलांना बांदल यांच्यातर्फे साडी-चोळी देवून सन्मानित करण्यात आले. तसेच दोन मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या माता-पित्यांचा सन्मान करण्यात आला.महिलादिनानिमित्त विठ्ठलवाडी ग्रामंपंचायतीतर्फे कन्यादान योजनेंतर्गत लाभार्थींना अनुदानाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तसेच येथील 16 महिला बचत गटांना प्रत्येकी 25 हजार रुपये अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत सरपंच अलका राऊत यांनी केले. राहूल गवारे, दिलीप गवारे,र घुनंदन गवारे, किसन गवारे आदींनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन केले.

Web Title: pune news shirur happy womens day zp pravin mane