कान्हूर मेसाई येथील अंगणवाडीत स्तनपान सप्ताह साजरा

युनूस तांबोळी
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे अंगणवाडीत स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी महिलांना पोष्ठिक आहाराचे महत्व सांगण्यात आले.

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे अंगणवाडीत स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी महिलांना पोष्ठिक आहाराचे महत्व सांगण्यात आले.

स्तनदा मातांना उपमा, शिरा, सातूचे पिठ, मोडाची मटकी, पालेभाज्या, केळी, अंडी, भात, दुध, डाळींब, काकडी, असा पुर्ण सात्विक आहार तयार करण्यात आला होता. अंगणवाडी मार्फत दिलेला आहार महिलांनी

घेतल्यास त्यांच्या आहारात सुधारणा होण्यास मदत होईल. अनेकवेळा महिला नेलेला आहार घेत नसल्याने बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढत जात आहे. असे अंगणवाडीतील सेवीकांनी सांगितले.

कान्हूर मेसाई, पुंडे मळा, घोलपवाडी, ननवरे मळा या अंगणवाडी केंद्रातील महिलांना एकत्रीत करण्यात आले होते. कृष्णा रामदास कुलट या विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करत कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.

यावेळी सरपंच सवीता पुंडे, अंगणवाडी सेवीका बिसम्मिला तांबोळी, सुलभा थोरात, मिनाक्षी बढे, बोबी गावडे, वर्षा घोलप, तृप्ती नरवडे, तसलीम तांबोळी, हरीताचे पशुधन अधिकारी डॅा. नवनाथ राक्षे, मालन जाधव, छत्तिसगडच्या जानकी साहू, पार्वती साहू, दिनेश साहू आदी महिला व विद्यार्थी उपस्थीत होते.

प्रत्येक अंगणवाडी मध्ये महिला व भविष्यातील पिढी आरोग्यमय करण्याचे काम होते. यासाठी अंगणवाडीचा आर्थीक स्तर वाढविणे गरजेचे आहे. गावागावात लोकसहभागातून अंगणवाडीला मदत करण्याचे धोरण आखले

पाहिजे. ग्रामसभेतून नागरीकांनी पुढाकार घेऊन अंगणवाडी ला मदत करणे अपेक्षीत असल्याचे सरपंच सवीता पुंडे यांनी सांगितले. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात प्रत्येक अंगणवाडीत 1 ते 7 ऑगस्ट  हा स्तनपान दिन साजरा येत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

Web Title: pune news shirur kanhur mesai Anganwadi lactation week celebrated