मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देणार: पाचर्णे

नागनाथ शिंगाडे
मंगळवार, 23 जानेवारी 2018

इंगळेनगर येथे जोडरस्त्यासह पुलाचे भूमिपूजन

तळेगाव ढमढेरे (शिरूर, पुणे) "मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून शिरूर मतदारसंघात विविध रस्त्यांची व पुलांची कामे मार्गी लागली आहेत. आगामी काळात रस्ते, वीज, पाणी व आरोग्य या मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देणार आहे. केंद्र व राज्य सरकार आणि जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून विविध विकासकामे पूर्णत्वाकडे नेण्यास प्राधान्य देणार आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे,'' अशी माहिती आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिली.

करंजावणे-इंगळेनगर (ता. शिरूर) येथे चासकमान कालव्यावरील जोडरस्त्यासह पुलाचे भूमिपूजन मंगळवारी करण्यात आले. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात पाचर्णे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल होते. या वेळी सरपंच शांतीदेव शिंदे, दिलीप पुणेकर, गोरक्ष काळे, भाऊसाहेब शिंदे, आनंदराव हरगुडे, कैलास सोनवणे, विजय रणसिंग, काळूराम पुणेकर, श्रीकांत सातपुते, रामहरी दौंडकर, उपसरपंच रवींद्र कुदळे, पोलिस पाटील किरण काळे, विठ्ठल वाघ, रोहिदास शिवले, संतोष कर्पे, संभाजी ढमढेरे, संदीप ढमढेरे, राजेश लांडे, अनिल सातव, रामदास आल्हाट, आबासाहेब सोनवणे, संतोष मोरे, दिलीप हिंगे, वाल्मीक सातकर, आबासाहेब शेलार आदी उपस्थित होते.

आमदार पाचर्णे म्हणाले, ""इंगळेनगर येथील कालव्यामुळे करंजावणे व इंगळेनगर, असे एका गावाचे दोन तुकडे झाले होते. या पुलामुळे ते जोडले जाणार आहेत. या पुलासाठी शासनाने 90 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. या पुलामुळे अष्टविनायक रांजणगाव गणपती, रांजणगाव एमआयडीसी, दहिवडी, सातकरवाडी, उरळगाव, पारोडी, न्हावरे आदी गावे जोडली जाणार असून, मोठा प्रवास लहान
होणार आहे. करंजावणे- दहिवडी रस्ता, भांबर्डे- गायकवाडवाडी रस्ता, कासारी फाटा- निमगाव म्हाळुंगी रस्ता, शिक्रापूर- तळेगाव ढमढेरे आदी रस्त्यांची प्रस्तावित कामेही लवकरच होणार आहेत.''

"दहिवडी येथे विजेचे उपकेंद्र'
""वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे-शिरूर- नगर- औरंगाबाद या महत्त्वाकांक्षी रस्त्याचे, शिक्रापूर-न्हावरे- चौफुला या राष्ट्रीय महामार्गाचे आणि बेल्हे- जेजुरी या रस्त्याच्या कामांची प्रशासकीय प्रक्रियाही प्रगतिपथावर आहे. यापैकी काही रस्त्यांचे टेंडर झाले आहे. आगामी काळात राज्य-जिल्हा व ग्रामीण रस्ते जोडण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. परिसरातील विजेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी दहिवडी येथे विजेचे उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे,'' असेही पाचर्णे यांनी सांगितले.

Web Title: pune news shirur mla baburao pacharne road bhumi pujan