आहाराबरोबर व्यायाम करणे गरजेचे: वैशाली चव्हाण

युनूस तांबोळी
शुक्रवार, 23 मार्च 2018

शिरूर: दैनंदिन जीवनात महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे हिमोग्लोबीनची कमतरता महिलांमध्ये सर्रास जाणवते. त्यासाठी योग्य आहाराबरोबर व्यायाम करणे गरजेचे असल्याचे मत तेजस्वीनी सर्वांगिण विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षा वैशाली चव्हाण यांनी व्यक्त केले.

शिरूर येथे श्रीराम पंचमी येथे जागतीक समाजकार्य दिनाचे औचीत्य साधून तेजस्वीनी सर्वांगीण विकास सेवा संस्थेच्या वतीने महिलाच्या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेचे पूजन करण्यात आले.

या शिबीरासाठी रूपाली देशमुख, संदिप निरवणे, पूजा पांचाळ, निलेश वाघ, विद्या गिरीगोसावी यांनी सहकार्य केले होते. या आरोग्य शिबीरासाठी नगरसेवक मनिषा कालेवार, रोहीणी बनकर, संगिता मल्लाव, रेखा लोखंडे, सुमन भोगावडे, सुलताना शेख, ज्योती पारधी आदी महिला उपस्थीत होत्या. न्हावरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून महिलांचे हिमोग्लोबीन, शूगर, ब्लडप्रेशर आदी तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळासाहेब गिरीगोसावी यांनी केले. कुमोदिनी बोऱ्हाडे यांनी आभार मानले.

Web Title: pune news shirur women health vaishali chavan