पं. शर्मा, झाकिर हुसेन यांची मैफल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

पाच वर्षांनंतर जोडी एकत्र; पुणेकर रसिकांना संगीताची मेजवानी

पुणे - ‘सा’ व ‘नी’ सूर संगीत संस्थेने शनिवारी (ता. १५) पंडित शिवकुमार शर्मा आणि उस्ताद झाकिर हुसेन यांच्या मैफलीचे आयोजन केले आहे. तब्बल पाच वर्षांनी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर या जगद्विख्यात जोडीचा एकत्र कार्यक्रम पुण्यात होतो आहे. कर्वेनगर परिसरातील पंडित फार्म येथे सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक आहे. 

भारतीय वाद्यसंगीत क्षेत्रातल्या या दोन दिग्गजांचे सहवादन ही संगीत रसिकांसाठी मेजवानीच असते. या मैफलीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आता थोड्याच प्रवेशिका उपलब्ध असल्याचे कार्यक्रमाचे संयोजक सुरेंद्र मोहिते यांनी सांगितले.

या ठिकाणी प्रवेशिका उपलब्ध
कार्यक्रमाच्या प्रवेशिका बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, टिळक स्मारक मंदिर व मराठे ज्वेलर्स, लक्ष्मी रस्ता येथे सकाळी १० ते दुपारी १२ व सायंकाळी ५ ते रात्री ८  या वेळेत उपलब्ध. ऑनलाइन बुकिंगसाठी www.bookmyshow.com . टेलिफोन बुकिंग संपर्क - ९२७०४२९०००.

Web Title: pune news shivkumar sharma & jhakir husain maifil