श्रीपाल सबनीस यांचे अध्यक्षीय भाषण इंग्रजीत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर डॉ. श्रीपाल सबनीस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात काय बोलतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. म्हणून साहित्य महामंडळाने त्यांच्या भाषणाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाषण सादर होण्याआधीच ते चर्चेत राहिले आणि नंतर गाजलेही. तेच भाषण आता इंग्रजी भाषेतून वाचकांच्या समोर येत आहे. 

पिंपरी-चिंचवड येथे झालेले 89वे साहित्य संमेलन वेगवेगळ्या कारणांमुळे गाजले. त्यातील एक कारण म्हणजे डॉ. सबनीस यांचे भाषण. ते आपल्या भाषणातून पुन्हा मोदींवर टीका करतील की काय, या भीतीमुळे महामंडळाने त्यांचे भाषण वाचून प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला; पण संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्यात त्यांच्या भाषणाची पुस्तिका वितरितच केली नाही. अशा वेगवेगळ्या घटनांनी भाषण चर्चेत राहिले. 

सबनीस यांच्या "संवाद आणि संघर्ष : सेक्‍युलर भूमिका' या भाषणाचा डॉ. ए. एन. माळी आणि आशुतोष भुपटकर यांनी नुकताच इंग्रजीत अनुवाद केला आहे. त्यांच्या "डायलॉग ऍण्ड डायलेक्‍टिक- अ सेक्‍युलर परस्पेक्‍टिव्ह' या भाषणाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार आहे. हा सोहळा महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे आयोजिण्यात आला असून, तो पत्रकार भवन येथे मंगळवारी (ता. 9) सायंकाळी सहा वाजता होणार आहे.

Web Title: pune news Shripal Sabnis