भारताच्या परराष्ट्र धोरणावरील सिद्धहस्त ग्रंथ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

पुणे - परराष्ट्र धोरण विश्‍लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या भारताच्या परराष्ट्र धोरण व सुरक्षा संबंधांवरील ‘भारताचे परराष्ट्र धोरण : नवीन प्रवाह’ या सकाळ प्रकाशनाच्या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे शालेय शिक्षण, उच्च तंत्रज्ञान व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी ६ वाजता स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल येथे होत आहे. या वेळी डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे पंतप्रधान मोदींचे परराष्ट्र धोरण या विषयावर व्याख्यान होणार आहे. 

सर्जिकल स्ट्राइक, पंतप्रधानांचा ऐतिहासिक इस्राईल दौरा, बलुचिस्तान व डोकलाम प्रश्‍न, सार्क परिषद रद्द होण्यामागील भारताची प्रभावी भूमिका, १७ वर्षांखालील फिफा फुटबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन, पुतिन, ट्रम्प, शी जिनपिंग या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रभावी नेत्यांना मागे टाकत जगातील तीन अव्वल नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी यांनी मिळवलेले स्थान या व इतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील घटनांमुळे भारताच्या परराष्ट्र धोरणातील एका स्थित्यंतराची दिशा स्पष्ट झाली आहे. 

या महत्त्वपूर्ण घडामोडींच्या अनुषंगाने डॉ. देवळाणकर मोदींच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा घेणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रवेशिका सकाळ, ५९५, बुधवार पेठ येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत उपलब्ध आहेत. ‘भारताचे परराष्ट्र धोरण : नवीन प्रवाह’ या पुस्तकाची किंमत ३५० रुपये आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ८८८८८४९०५० (कार्यालयीन वेळेत).

पुस्तकात हे वाचा
‘भारताचे परराष्ट्र धोरण - नवीन प्रवाह’ पुस्तकात भारताचे विविध देशांसोबतचे परराष्ट्र धोरण व सुरक्षा संबंध, भारतीय परराष्ट्र धोरणातील नवे प्रवाह, भारतीय परराष्ट्र धोरणापुढील नवी आव्हाने, पंतप्रधानांचे विदेश दौरे, त्यातील विविध करार, महत्त्वाच्या जागतिक परिषदा यांचे विवेचन ताज्या संदर्भासहित करण्यात आले आहे. भारताचे आशिया व इतर खंडांतील महत्त्वपूर्ण राष्ट्रांशी असणारे आर्थिक, सांस्कृतिक व सामरिक संबंध यांचा अभ्यासपूर्ण परिचय हे पुस्तक करून देते. जागतिक दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संघटना व भारत या विषयांबरोबरच भारताची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था याविषयी सविस्तर चर्चा महत्त्वाच्या घटनाक्रमांनुसार या अद्ययावत संदर्भ पुस्तकात करण्यात आली आहे. हे पुस्तक यूपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी, राज्यशास्त्र; तसेच आंतरराष्ट्रीय राजकारण, परराष्ट्र धोरण व आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करणारे पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, प्राध्यापक, पत्रकार या सर्वांसाठीच उपयुक्त आहे.

Web Title: pune news siddhahast book on india foreign policy