पुणे : सिंहगडावर जाणारा रस्ता वाहतुकीला बंदच 

राजेंद्रकृष्ण कापसे 
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

सूट्टीच्या दिवशी सुमारे दहा हजार पर्यटक येत असतात. या आठवड्यात अनेक सुट्ट्या आहेत. त्यामुळे हजारो पर्यटक गडावर येण्याची शक्यता आहे. परंतु दरडी पडत असल्याने सुरक्षितता म्हणून रस्ता बंद ठेवला आहे.

खडकवासला : सिंहगडावर जाणारा रस्ता दरडी पडत असल्याने अजून देखील वाहतुकीला बंद असणार आहे, अशी माहिती वन विभाग व घेरा सिंहगड वन संरक्षण समितीच्या वतीने सांगितले.

सूट्टीच्या दिवशी सुमारे दहा हजार पर्यटक येत असतात. या आठवड्यात अनेक सुट्ट्या आहेत. त्यामुळे हजारो पर्यटक गडावर येण्याची शक्यता आहे. परंतु दरडी पडत असल्याने सुरक्षितता म्हणून रस्ता बंद ठेवला आहे. घाटरस्ता नऊ किलोमीटरचा आहे. त्यामध्ये यंदा 15 दिवसात दोनदा दरडी पडली. त्यावेळी सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

घाट रस्ता वाहतुकीला धोकादायक आहे. म्हणून जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी घाटरस्ता वाहतुकीला बंद केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आयआयटी च्या तज्ञाकडून तपासणी केली आहे. त्याचा अहवाल येईपर्यंत गड वाहतुकीला बंद ठेवला जाणार आहे. असे सहायक उपवनसंरक्षक महेश भावसार यांनी सांगितले.

Web Title: Pune news Singhgad fort road closed