'सोशल मीडियाचा दुरुपयोग चिंताजनक'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

पुणे - स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवा दिनाचे औचित्य साधून यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क आणि स. प. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने "यिन संवाद' या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ उपस्थित होते. 

"आजच्या युवा पिढीसमोरील प्रश्‍न व आव्हाने' या विषयावर मार्गदर्शन करताना बर्गे म्हणाले, ""विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाबरोबरच सामाजिक कार्यातही उत्साहाने सहभाग नोंदवला पाहिजे. भारताचा नागरिक म्हणून तसेच एक कर्तव्यदक्ष विद्यार्थी म्हणून प्रत्येकाने दैनंदिन जीवनात दक्ष राहणे खूप गरजेचे आहे. येणारा काळ हा युवा पिढीचा त्याचप्रमाणे डिजिटल काळ आहे. त्याचा किती प्रमाणात आणि कसा वापर करायचा, हे प्रत्येकाने ओळखणे खूप गरजेचे आहे.'' 

सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराबद्दल चिंता व्यक्त करीत, मैदानी खेळ खेळण्यापेक्षा हल्लीची युवा पिढी मोबाईलमध्ये गुंतलेली पाहायला मिळते, असे निरीक्षणही बर्गे यांनी नोंदविले. समाजात तेढ निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर वाढल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. 

विद्यार्थिदशेत असताना वेळेचा सदुपयोग कसा केला पाहिजे, यावर भाष्य करताना प्राचार्य शेठ म्हणाले, ""आयुष्यात प्रत्येकाने स्वत-साठी वेळ दिलाच पाहिजे; मग तो व्यायामाच्या स्वरूपात असो अथवा वाचनाच्या स्वरूपात.'' 

शेवटी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना दिलखुलास उत्तरे मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता जहागीरदार आणि कृष्ण पाटोदे यांनी केले. उपप्राचार्य दुसाने यांनी आभार मानले. 

Web Title: pune news social media YIN Bhanupratap Barge