दक्षिण विभाग प्रमुखांचे ‘सुखोई’तून उड्डाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

पुणे - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी हवाई दलाच्या ताफ्यातील लढाऊ विमान असलेल्या सुखोईतून गुरुवारी उड्डाण केले. हवाई दल आणि लष्कर यांच्यातील समन्वयाचा संदेश या उड्डाणातून देण्यात आला.

विंग कमांडर तरुण गुप्ता यांच्यासोबत सोनी यांनी उड्डाण केले. सुमारे आठ हजार फुटांवरून ‘सुखोई’ने प्रवास केला. लष्करी तुकड्या आणि रणगाडे यांच्या सराव क्षेत्राची हवाई पाहणी करण्यात आली. 

संरक्षण विभागातील तीनही दलांमध्ये समन्वयातूनच आधुनिक काळातील कोणत्याही युद्धात विजय मिळविता येईल, असा विश्‍वासही सोनी यांनी या वेळी व्यक्त केला.

Web Title: pune news South Zone Chief Sukhoi