तरुणींमध्ये स्ट्रीट शॉपिंगची वाढती क्रेझ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

पुणे - सध्या तरुणींमध्ये स्ट्रीट शॉपिंग क्रेझ मॉलपेक्षा अधिक वाढली आहे. त्यामुळेच ती कुठे व कशी करता येईल, लेटेस्ट ट्रेंड कोणता, त्यातील हटके फॅशन कोणती, अशा विविध गोष्टींची माहिती आता तरुणींना सोशल मीडियाद्वारे मिळत आहे. पुणे असो मुंबई स्ट्रीट शॉपिंगचे नवेनवे पर्याय तरुणींना शोधण्यास मदत होत आहे. विविध स्ट्रीट शॉपिंग ॲप्लिकेशनबरोबरच फेसबुक आणि विविध संकेतस्थळांच्या माध्यमातून हा ट्रेंडही तरुणींपर्यंत पोचत आहे. फॅशनेबल कपड्यांपासून ते फूटवेअरपर्यंतच्या वेगळा लुक देणाऱ्या आणि परवडणाऱ्या दरातील या वस्तूंची खरेदी अगदी सहजपणे करता यावी, यासाठी तरुणी सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. 

मॉलमध्ये एकाच छताखाली फॅशनेबल लुक देणाऱ्या सर्व वस्तू मिळतात; पण मॉलमध्ये महाग असल्यामुळे त्यांची खरेदी करणे काही जणींना परवडत नाही. त्यामुळे स्ट्रीट शॉपिंगवर तरुणींचा भर असतो. त्यामुळेच शॉपिंगला जाण्यापूर्वी मार्केटमधील लेटेस्ट फॅशन, ट्रेंड अशी माहिती मिळवण्यासाठी तरुणी सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. सोशल मीडियाद्वारे स्ट्रीट शॉपिंगचे नवे पर्याय शोधत आहेत. विविध ॲप्लिकेशन, फेसबुक आणि संकेस्तस्थळांवर स्ट्रीट शॉपिंग कुठे करता येईल आणि कसे याची माहिती उपलब्ध असल्याने तरुणींची स्ट्रीट शॉपिंग सोपी बनली आहे. 

याबाबत चैताली चव्हाण म्हणाली, ‘‘पुण्यात आता नवनवे स्ट्रीट शॉपिंगचे पर्याय निर्माण झाले आहेत. त्यामुळे खरेदीसाठी जाण्यापूर्वी मी येथील लेटेस्ट फॅशन पहिल्यांदा सोशल मीडियाद्वारे जाणून घेते आणि त्यानंतर शॉपिंगला जाते. स्ट्रीट शॉपिंग परवडणारी असून, मॉलपेक्षा मी या पर्यायाला तरुणींची पसंती मिळत आहे.’’

स्ट्रीट शॉपिंगमुळे वेगळा लुक
मॉल शॉपिंग काहींना परवडणारे नसते. म्हणूनच आता लेटेस्ट फॅशन अन्‌ हटके लुकसाठी तरुणींमध्ये स्ट्रीट शॉपिंगची क्रेझ वाढली आहे. मॉलपेक्षा परवडणाऱ्या दरात स्ट्रीट शॉपिंग करताना कपड्यांपासून ते ज्वेलरीपर्यंत आणि फूटवेअरपासून ते एक्‍सेसरीजपर्यंत संपूर्ण लुक मिळत असल्याने याकडे तरुणींचा कल वाढला आहे. 

पुण्यातील स्ट्रीट शॉपिंगचे पर्याय
पुण्यात स्ट्रीट शॉपिंगसाठी तुळशीबाग आणि लक्ष्मी रस्त्याच्या जोडीला आता स्ट्रीट शॉपिंगच्या नव्या पर्यायांनी तरुणींना भुरळ घातली आहे. फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, कॅम्प अशा विविध भागांत स्ट्रीट शॉपिंगचे नवे पर्याय प्रसिद्ध झाले आहेत. परवडणाऱ्या दरात आपल्याला हव्या त्या वस्तू मिळत असल्याने या नव्या ठिकाणी तरुणींची शॉपिंगसाठी गर्दी पाहायला मिळते. विकेंड असेल तर या ठिकाणी तरुणी शॉपिंगसाठी आवर्जून गर्दी करतात.

Web Title: pune news street shooping craze increase in girls