विद्यार्थ्यांनी गिरविले "अग्निशमन'चे धडे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

पुणे - इमारतीला अचानक आग लागली तर अवघ्या तीन मिनिटांत बाहेर कसे पडायचे, आडोशाचा आधार कसा घ्यायचा, अन्य सहकाऱ्यांचे प्राण कसे वाचवायचे, सर्व जण इमारतीतून बाहेर सुखरूप आले आहेत का? याची खात्री कशी करून घ्यायची, याचे प्रात्यक्षिक अग्निशामक दलाचे जवान सादर करत होते. मॉकड्रीलच्या माध्यमातून विद्यार्थी आग विझविण्याचे धडे गिरवत होते. 

राष्ट्रीय अग्निशमन आणि बचाव संचलन दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता येथे शाळेच्या मैदानावर मॉकड्रील सादर करण्यात आले. सेफ किड्‌स फाउंडेशन व हनीवेल संस्थांतर्फे हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. तत्पूर्वी डी. ई. एस. स्कूलच्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी प्रशांत रणपिसे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, सेफ किड्‌स फाउंडेशनच्या संचालिका डॉ. सिंथिया पिंटो, संगीता गले, किरण देशपांडे, नीरज पूर्णपात्रे, मुख्याध्यापिका सुजाता नायडू उपस्थित होत्या. 

रणपिसे म्हणाले, ""आगीपासूनच्या सुरक्षितेसंदर्भात देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांतही मॉकड्रीलच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. दलाकडे तुटपुंजा कर्मचारी वर्ग असल्याने यासाठी अन्य सेवाभावी संस्थांचे सहकार्य घेण्यात येते. अनेक शाळांमध्ये सुरक्षाविषयक उपकरणे आहेत. मॉकड्रीलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संरक्षणसंबंधी मार्गदर्शन केल्यामुळे विद्यार्थी-पालक आणि वाड्यावस्त्यांपर्यंत हा विषय पोचू शकतो.'' 

डॉ. पिंटो म्हणाल्या, ""पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत वीस हजार विद्यार्थी, 550 शिक्षक आणि एक हजार पालकांना अग्निशमन सुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले. "सेफ किड्‌स ऍट होम' या उपक्रमांतर्गत भविष्यातही पुणेकरांचे सहकार्य लाभेल.''

Web Title: pune news student fire brigade