'वजनाकाट्यांच्या तपासणीसाठी भरारी पथके'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

पुणे - शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यात आल्यानंतर काटा मारून वजन कमी दाखविले जात असल्याची तक्रार शेतकरी संघटनांकडून केली जाते. याची दखल घेत यंदाच्या हंगामापासून कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणीसाठी भरारी पथके नेमणार आहे, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी (ता. 17) दिली. 

साखर आयुक्तालयाच्या वतीने ऑनलाइन गाळप परवान्यांचे वितरण सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाले. या वेळी साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील, किशोर तोष्णीवाल आदी संचालक उपस्थित होते. 

देशमुख म्हणाले, "कारखान्यांच्या वजनकाट्यांच्या तक्रारी लक्षात घेता अचानक भेटी देऊन तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यात साखर आयुक्तालय, वजनकाटा मापन विभाग, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा पथकामध्ये समावेश असेल. जिल्ह्यातील कारखान्यांची संख्या लक्षात घेऊन पथकांची नेमणूक करण्याचे पत्र ज्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना आयुक्तालयामार्फत पाठविले आहे. तपासणीदरम्यान दोषी वजनकाटे आढळल्यास कडक कारवाई केली जाईल. 

दरम्यान, साखर आयुक्तालयाचा कारभार गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी कारखान्यांना ऑनलाइन परवाने देण्यात येत आहेत. 193 कारखान्यांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 53 कारखान्यांना ऑनलाइन परवान्यांचे वाटप आज करण्यात आले. 

थेऊरचा कारखाना पुन्हा सुरू 
सध्या राज्यातील 40 कारखाने बंद आहेत. त्यामध्ये काहींवर प्रशासक आणि अवसायकांची नेमणूक केली आहे. कारखान्यांच्या व्याजाचा भुर्दंड कमी करण्यासाठी अवसायक नेमले आहेत. यंदाच्या हंगामात बंदपैकी 10 ते 12 कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. मात्र कोणताही कारखाना विकू नये अशी राज्य सरकारची भूमिका आहे. पुण्यातील थेऊरच्या यशवंत सहकारी कारखाना प्रायोगिक तत्त्वावर पुन्हा सुरू करणार आहे, असे सुभाष देशमुख यांनी सांगितले.

Web Title: pune news subhash deshmukh farmer