यशस्वी अभियंत्यांनी उलगडल्या यशोकथा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

पुणे - शिक्षण संपवून अल्पावधीत स्वतःच्या पायावर उभे राहणाऱ्या दहा यशस्वी अभियंत्यांचा शेतकरी शिक्षण मंडळ यांच्या भिवराबाई सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (नऱ्हे) च्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. या अभियंत्यांनी आपल्या यशामागील रहस्य विद्यार्थ्यांना सांगितले. या निमित्ताने महाविद्यालयीन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण, तसेच उद्योग आणि महाविद्यालयातील सुसंवाद या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 

कार्यक्रमासाठी हरेश्‍वर पोतदार (आरटीओ, नवी मुंबई), संस्थेचे संचालक अनिल भोसले हेही उपस्थित होते. यशस्वी अभियंत्यांच्या यशोकथांचा समावेश असलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी झाले. स्वप्नील तारते व लकी सुराणा यांनी "प्रयत्न करा आणि आशा सोडू नका', असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. 

या कार्यक्रमासाठी संकुल संचालक प्रा. एस. आर. थिटे, प्रा. डॉ. डी. एस. बिलगी, उपप्राचार्य डॉ. जी. ए. हिंगे, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. एम. व्ही. दळवी हेही उपस्थित होते. 

डॉ. बिलगी यांनी महाविद्यालये आणि उद्योग यामधील दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सुचविले. डॉ. हिंगे यांनी आभार मानले. प्रा. जी. आर. पदमवार, प्रा. एस. एम. शहा, प्रा. एस. जी. देशपांडे, प्रा. पी. एस. करांडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

Web Title: pune news Successful engineers

टॅग्स