उन्हाचा चटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

पुणे - शहरात उन्हाचा चटका वाढत असून, पुढील चोवीस तासांमध्ये याची तीव्रता वाढेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. शहरात मंगळवारी संध्याकाळपर्यंत ३६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शहर आणि परिसरात रविवारी ढगाळ वातावरण होते. कोथरूड, पाषाण, धायरी, बाणेर, कात्रज या उपनगरांमध्ये पावसाच्या सरींनी हजेरीही लावली होती.

त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीपर्यंत खाली उतरला होता. मात्र, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाली. उत्तरेतील वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव मावळला. याचा थेट परिणाम पुण्यातील वातावरणावर झाला.

Web Title: pune news summer temperature