इंदापूर तालुक्यामध्ये मोफत दंत उपचार शिबिराचे आयोजन....

राजकुमार थोरात
रविवार, 11 मार्च 2018

ग्रामीण भागातील नागरिक दाताच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे  दातांचे अनेक विकार जडतात.तसेच दातांवरती उपचार करणे खर्चिक असल्यामुळे उपचार करण्याचे ही टाळतात. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यामातुन  बिजवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोफत दंत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

वालचंदनगर - बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने बिजवडी (ता.इंदापूर) येथे पुणे जिल्हा परिषद  व  इंडियन डेंटल असोसिएशन  यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार (ता.१२) व मंगळवार (ता.१३) रोजी मोफत दंत उपचार व मौखिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.

केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी विविध शिबिराचे आयोजन करण्यात येते.ग्रामीण भागातील नागरिक दाताच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे  दातांचे अनेक विकार जडतात.तसेच दातांवरती उपचार करणे खर्चिक असल्यामुळे उपचार करण्याचे ही टाळतात. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यामातुन  बिजवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोफत दंत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरामध्ये दातांचा एक्सरे काढणे,फिक्स दात बसवणे,दातामध्ये कॉम्पोझिट सिमेंट भरणे,दात साफ करणे,दात,दाढ काढणे,मुख कर्करोगाची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.शिबिरासाठी मुंबईहून ३० डाॅक्टराचे पथक दंतचिकित्सेच्या अत्याधुनिक मशिनरीसह येणार असल्याने जास्तीजास्त नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन माने यांनी केले.

Web Title: pune news supriya sule ncp