ताबूतचे भव्य मिरवणुकीनंतर मोठ्या भावूक वातावरणात विसर्जन

युनूस तांबोळी
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे):
ये अलबीदा...ये अलबीदा...शाहेशहि दो अलबीदा.
ये हुसेन इबने अली दो जख के सुलताना अलबीदा...
हुरो मालीक मिलकर आये हाथ नुरके तबाक लाये...
हुसेन...मारे कहॅा दभनाए बोलो अय्या. ये अलबीदा...

या भावपुर्ण गिताने शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात मुस्लीम धर्मीय बांधवांचे मोहरमचे ताबूत विसर्जन शांततेत पार पडले.

कवठे येमाई, मलठण, रावडेवाडी, टाकळी हाजी या परीसरात मोहरम सणानिमित्त ताबूत ची स्थापना करण्यात आली होती. धर्मीय जागृती ला महत्व देणाऱ्या चा हा सण असतो. त्यामुळे या सणात धर्मासाठी बलीदान

देणाऱ्यांची आठवण त्यांच्या त्यागाची स्मृती देण्यासाठी या सणाला महत्व दिले गेले आहे. दहा दिवस उपवास (रोजा) करून देखील मुस्लीम बांधव हा सण साजरा करताना दिसतात. सर्व डाळींचा एकत्र मिळून खिचडा

करण्यात येतो. दहा दिवस पाण पोई तयार करून गरजूंना पाणी पुरविण्यासाठी मुस्लीम बांधव पुढाकार घेताना दिसतात. या सणात कुराण पठणला अधिक मह्त्व दिले गेले आहे.

गुरूवारी (ता. 28) मोहरमच्या सात तारखेला तांबूतची स्थापना करण्यात आली. शनिवारी (ता. 30) कत्तलची रात्र म्हणून साजरी करण्यात आली. रवीवारी (ता. 1) सकाळपासून मुस्लीम बांधवांबरोबर हिंदू बांधवांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारी सरबत वाटण्याचा कार्यक्रम जागोजागी पार पडला. मुस्लीम बांधवांनी यावेळी रोट तयार केले होते. सायंकाळी ताबूतच्या भव्य मिरवणुकीनंतर मोठ्या भावूक वातावरणात विसर्जन करण्यात आले. या वेळी गावागावात मुस्लीम बांधवाबरोबर हिंदू बांधव सामिल झाले होते.

Web Title: pune news tabut and muharram festival in shirur taluka

टॅग्स